ब्रेकिंग न्युज

परळी: लॉकडाऊनमुळे खरबूज उत्पादक शेतकरी अडचणीत ; शेतकरी नागराज गित्ते यांची मदतीची प्रशासनाकडे मागणी

परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम― तालुक्यातील मौजे नंदागौळ येथील प्रगतशील शेतकरी नागराज गित्ते यांनी शेतात दोन एकर मध्ये खरबूज पीकांची लागवड केली. पीक जोमात आले परंतु कोरोनाच्या संकटामुळे चांगला भाव व बाजारपेठ अभावी विक्री होत नसल्यामुळे खरबूज खराब होत आहेत. शेतकरी गित्ते हे मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

Png;base64,iVBORw0KGgoAAAANSUhEUgAAAYYAAADcAQMAAABOLJSDAAAAA1BMVEUAAACnej3aAAAAAXRSTlMAQObYZgAAACJJREFUaIHtwTEBAAAAwqD1T20ND6AAAAAAAAAAAAAA4N8AKvgAAUFIrrEAAAAASUVORK5CYII=

कोरोना या आजारामुळे देशात सुरू असणाऱ्या लॉक डाऊन मुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. हातात आलेल्या खरबूज पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे किरकोळ ग्रामीण खरेदीला ग्राहक नसल्याने कवडीमोल दर देवून विकण्यास हतबल झाला आहे. नंदागौळ येथील प्रगतशील शेतकरी नागराज गित्ते यांनी पारंपरिक पद्धतीने शेती करत असतांना खरबूज पीकांची लागवड केली. खरबूज पीकही जोमात आले आहे. पंरतु बाजारपेठ उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. गित्ते यांनी दोन एकर मध्ये खरबूजाची लागवड केली. कष्टाने व पाणी असल्याने पीक चांगल्या प्रकारे उत्पादीत झाले आहे. लाँकडाऊनमुळे शेतकरी गित्ते यांनी मेहनतीने पिकविलेल्या खरबूज पीकांवर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. शासनाने पंचनामे करत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
कोरोनाचा संकट वाढल्यानं देशात लॉकडाउन लागू करण्यात आला. लॉकडाउनमुळे अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तुंची विक्री वगळता सर्व व्यवहार बंद आहेत. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत शेतकर्‍याला “राजा” म्हणुन संबोधले जात असले तरी वेळोवेळी त्याचाच “बळी” दिला जातो. म्हणुनच त्याला “बळी राजा” संबोधले जाऊ लागले आहे. आजही शेतकऱ्यांचे आतोनात हाल केले होत आहेत. पिकवलेला भाजीपाला आणि फळ कवडीमोल दराने खरेदी केले जात आहे. खर्च आणि उत्पादनाचा मेळ बसत नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. शेतकरी नागराज गित्ते यांनी खरबूज लागवड केली आहे. ठिंबक ,मल्चिंग, औषध फवारणी, अच्छादन मजुरांचा पगार असा खर्च एकुण एकरी एक लाख रुपये तर एकुण दोन लाख रुपये केला आहे. याशिवाय उत्पादन चांगल्या निघण्यासाठी वेळोवेळी लक्ष देऊन निगा राखली आहे. वेळोवेळी पाणी दिल्याने पीक जोमात आले होते. खरबूज पीक बाजारात गेल्यावर कष्टाची चीज निघेल अशी अपेक्षा कुटुंबाची होती. परंतु कोरोनाच्या संकटामुळे सर्व काही लाँकडाऊन झाले. पीक आले आहे परंतु बाजार पेठ नसल्यामुळे खरबूज जागेवरच सडून जात आहेत.किरकोळ माल किती विक्री करणार असा प्रश्न? निर्माण झाला आहे. खरबूज हे पीक नाशिवंत असल्यामुळे शेतकरी कुटुंबाला केलेला खर्च तरी निघेल का असा प्रश्न सतावत आहे. कोरोनामुळे शेतकऱ्यांचे पीक मातीत मिसळले आहे. पीक बहरले असून बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे विक्री कुठे करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी अत्यंत मेहनतीने खरबूजाची जोपासना केली असून पीक अगदी जोमाने आले आहे. मात्र आपल्याच मेहनतीचे पीक डोळ्या देखत शेतातच खराब होत असून लाखों रूपयांचे नुकसान होत असल्याने या शेतकऱ्यांच्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले आहेत. शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी नागराज गित्ते यांनी केली आहे.

Back to top button