अहमदनगर जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19

अहमदनगर: धांदरफळ येथील आणखी एक व्यक्ती कोरोना बाधित ; जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ५३

अहमदनगर, दि.०९:आठवडा विशेष टीम― संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील मृत्यु पावलेल्या वृध्द व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही ३६ वर्षीय व्यक्ती धांदरफळ येथीलच आहे. या व्यक्तीचा अहवाल आज प्राप्त झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ५३ झाली आहे. तर, धांदरफळ येथील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ०८ झाली आहे.