कार्यक्रमपाटोदा तालुकासामाजिक

शिवजयंती निमित्त राजमुद्रा संघटनेचा उपक्रम; अल्पदरात मराठा जात प्रमाणपत्र

कुसळंब (वार्ताहार) दि.०३: शिवजयंती म्हटले कि छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार , कार्य , वैज्ञानिक दुष्टीकोन , दहा नैतिक मुल्य डोळ्या समोर येतात ज्या पध्दतीने शाळेमध्ये सकाळी सकाळी दहा नैतिक मुल्य शिकवले जातात ते दहा नैतिक मुल्य शिवजयंती आली कि आपोआप डोळ्या समोर येतात आणि त्या पध्दतीने चलण्याचे मार्ग दाखवतात तेच विचार तिच शिकवण आम्ही आज आचारणात आणून त्या पध्दतीने चालण्याचा पर्यंत करत आहोत आपण समाजाचे काही देणे लागतो या उद्देशाने राजमुद्रा संघटनेच्या माध्यमातून समाजाची थोडी मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणून शिवजयंती निमित्ताने मराठा जात प्रमाणपत्र हे अल्फदरात देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे त्याचा लाभ समाज बांधवांनी घ्यावा असे आहवान राजमुद्रा संघटनेचे पाटोदा तालुकाध्यक्ष सचिनराजे पवार यांनी केले आहे .
शिवजयंती निमित्ताने विविध उपक्रम घेतले जातत वेगवेगळ्या पध्दतीने खर्च हि केला जातो काही वर्षापूर्वी शिवजयंती दिवशी काही ठिकाण धिंगाना घालत शिवजयंती साजरी केली जात होती परंतू गेल्या दोन वर्षा पासून शिवजयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम घेतले जात आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आत्मसात केले जात आहेत शिवजयंती म्हटले की विचारांची देवान घेवान होताना पहायला मिळत आहे शिवजयंती फक्त शिवजयंती राहिली नसून शिवजयंती दिवशी प्रत्येक घरा घरा मध्ये सण साजरा होताना दिसत आहे . खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात येताना दिसत आहे . राजमुद्रा संघटनेच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी वेगवेगळे उपक्रम घेत आहोत या वर्षी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याने आम्ही मराठा जात प्रमाणपत्र हे अल्फदरात काढुन देत आहोत याचा लाभ मराठा समाजातील समाज बांधवांनी घ्यावा असे आवाहन राजमुद्रा संघटनेचे पाटोदा तालुकाध्यक्ष सचिनराजे पवार यांनी केले आहे .

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.