कोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाबीड तालुकाब्रेकिंग न्युजलिंबागणेश सर्कल

ऊसतोड मजूर घरी परतले ,२८ दिवस होमक्वारांटाईनच काय झालं ,मोफत किराणा किट ग्रामपंचायतच्या घशात का ? – डॉ ढवळे

अजित कुंभार साहेब यांच्या आदेशाचे पालन कोण करणार ?

बीड:आठवडा विशेष टीम―बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश, मौजे ससेवाडी , मौजे बेलगांव , मौजे सोमनाथ वाडी , मौजे पोखरी , मौजे अंजनवती , येथिल दलित समाजातील आणि दुर्बल घटकातील तसेच ज्यांची दबुन राहण्याची मानसिकता आहे ते वगळता इतर सर्व जण ज्यादिवशी साखर कारखान्यावरुन आले त्याचदिवशी आपापल्या घरी गावात रहायला गेले होते. केवळ अधिकारी तपासणीसाठी आले तर दाखवण्यासाठी म्हणुन या लोकांना गावठाणाबाहेर ठेवण्यात आले होते.

अजित कुंभार यांच्या २८ दिवस गावाच्या हद्दीत,गावठाणाबाहेर या आदेशाचे पालन कोण करणार ? – डॉ.गणेश ढवळे यांचा सवाल

दि. ०५/०५/२०२० रोजी जिल्हा परिषद बीड(वैयक्तिक शाखा )क्र.मुकाअ/वैशा/१३/२०२० बीड या आदेशानुसार संबंधित गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना शासन आदेशानुसार जिल्ह्यात परत आलेल्या ऊसतोड मजूर कुटुंबांना कोविड १९ आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्र्वभूमीवर मोफत अन्नधान्य व जीवनोपयोगी वस्तुंच्या किटचे वाटप करणेबाबत यामध्ये नमुद करताना या मजुरांना परत आल्यानंतर स्वत:च्या गावच्या हद्दीत २८ दीवसांसाठी विलगीकरणात ठेवण्यात येणार असुन त्यांना त्यामुळे कोणताही रोजगार करता येणार नाही.या कालावधीत त्यांची उपासमार होऊ नये या उद्देशाने जिल्हा परिषदेने स्वत:च्यासन२०२०-२१च्या स्वनिधितुन या कुटुंबियांना अन्नधान्य व जीवनोपयोगी वस्तुंच्या किटचे मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यात त्यांनी समिती नेमुन१) संनियंत्रण अधिकारी २) सरपंच ३) उपसरपंच ४) व ५) गावातील दोन नागरीक पैकी एक महीला ( शक्यतो ऊसतोड मजूर)६) पोलिस पाटील कींवा शासकीय कर्मचारी ७) ग्रामसेवक यांनी शासकीय प्रक्रियेचा अवलंब करून एका अन्नधान्य कीटची अधिकतम कींमत वाहतुकिसह रक्कम रु.६५०/-इतकी निश्र्चित करण्यात आली असुन ग्रांमपंचायतींनी रू.६५०/- वा कमी कींमतीत या कीटची खरेदी करावी. यामध्ये समाविष्ट वस्तु १) तांदूळ कोलम ५किलो ,२) सोयाबीन तेल १लिटर ३)साखर १किलो ४)तुरदाळ उच्च प्रतिची १ कीलो ५)आयोडीन युक्त बारीक मिठ १ किलो.६)मिरची पावडर २००ग्राम ७)हळद पावडर १००ग्राम ८) कांदा, लसुण,मसाला २०० ग्राम ९)जिरे १००ग्राम १०) मोहरी १०० ग्राम ११) साबण अंगाचा ( किमान ७५ ग्राम ) लाईफ बाय , डेटांल १ नग १२) साबण कपड्याचा किमान( ७५ ग्राम ) व्हिल १ नग आणि जिल्हा परिषद मार्फत पुरविण्यात येणारे हन्डबिल / पाम्पलेट प्रत्येक किट मधे टाकले जाईल याची खातरजमा गटविकास अधिकारी व संनियंत्रण अधिकारी यांनी करावी असे लेखी आदेश दिले आहेत.

वस्तुस्थिती आणि विपर्यास

" वस्तुस्थिती अशी आहे की ९० टक्के ऊसतोड मजूर साखर कारखान्यावरुन आलेल्या दिवशीच स्वत:च्या गावातील घरी राहण्यास गेले होते. " – डॉ गणेश ढवळे

सरपंच यांनी विरोध न करण्याची कारणे :

१) सरपंच यांना भविष्यात मतदान मागण्यांसाठी अडचण येऊ नये म्हणून त्यांना विरोध केला नाही.
२) बरेच सरपंच हे ऊसतोड मजुरांचे मुकादम यांच्या ( म्हणजे ग्रांमपंचायत निवडणुकीत पैसा खर्च करणे) जीवावर सरपंच झाले आहेत

ग्रामसेवक / तलाठी यांनी विरोध न करण्याची कारणे:

१) त्यांना जिल्हाधिकारी बीड यांनी दिलेल्या आदेशानुसार ऊसतोड मजुरांना सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील.
२) आपणास दररोज या गावांना बीड वरून येऊन भेटी द्याव्या लागतील.
३) आपणास जिल्हाधिकारी बीड यांनी दि. २३/०४/२०२० रोजी दिलेल्या आदेशानुसार मुख्यालयी रहावे लागेल.

१४ दिवसानंतर मोफत किराणा किट वाटप करून घरी पाठवणे :

अजित कुंभार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी २८ दिवस होम क्वारंटाईन कालावधी लेखी दिलेला असताना १४ दिवसात मोफत किराणा किट वाटप करून घरी पाठवणे यामध्ये ग्रांमपंचायत नंतर येणारा निधी तुम्ही तुमच्याच घरी राहतात म्हणून पुढील निधी जिल्हा परिषद प्रशासनाने दिलाच नाही हे कारण सांगून त्यांना निधी न वाटता ज्या प्रमाणे १४ वा वित्त आयोगाच्या निधीमध्ये अपहार केला जातो तसाच या निधिचा अपहार करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वरील प्रक्रियेचे पालन न करणे तसेच कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी संबंधितांवर राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा नुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येऊ शकते.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.