पाटोदाचे गुत्तेदार तावातावात आणि मुख्य बाजारपेठ बाराच्या भावात, लोकप्रतिनिधींचे सोयीस्कर दुर्लक्ष, व्यापारी वर्गामध्ये संतापाचे वातावरण―डॉ ढवळे

पाटोदा दि.११:आठवडा विशेष टीमपाटोदा तालुक्यातील पैठण ते पंढरपूर राज्यमार्ग बसस्थानक परिसरात आठ दिवसांपूर्वी परळीतील तिरूपती कन्स्ट्क्शनचे ठेकेदार केशव आघाव यांनी राज्यमार्गाचे खोदकाम सुरू केले.परंतु स्थानिक गुत्तेदारांनी खोदकामातील मटेरियल फुकट न्यायचे कि विकत या गदारोळात तावातावाने भांडण्यास सुरूवात केली परीणामी गुत्तेदाराने सर्व कामासाठीची मशिनरी ईतरत्र हलवली आणि काम बंद पाडले, नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने गुडघाभर पाणी साचलेले आहे तसेच पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटल्याने दुषित पाणी पुरवठा झाल्यामुळे साथीचे आजार वाढवण्याची शक्यता आहे, त्यामुळे आठ दिवसांत रस्ता काम पूर्ण करण्याचे आदेश संबंधित गुत्तेदाराला द्यावेत यासाठी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी मार्फत पंतप्रधान, मा.नितिन गडकरी, मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड धनंजय मुंडे यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे पाठवले आहे.

गणेश कवडे ,कांग्रेस तालुकाध्यक्ष पाटोदा मो.नं.९५६१५८५९८८

"पैठण-पंढरपुर मार्गावरील मुख्य बाजारपेठ असुन पावसाळ्याच्या तोंडावर खोदकाम केलेले आहे, गल्लीतील रस्ते बंद झाले आहेत, कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर दुषित पाणी साचले आहे, आठ दिवसात रस्ता काम पुर्ण करावे, तहसिलदार, नगराध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले आहे परंतु लक्ष देत नाहीत."

डॉ.लक्ष्मण जाधव , खाजगी वैद्यकीय व्यावसायिक मो.नं.९३७०८५३२९२

माझ्या परीवार हांस्पिटल समोर कमरेईतका पाण्याचा ढव्ह झाला आहे.मलेरीयाचे जंतू वळवळ करतात, आधीच कोरोनाने लोक भयभीत झाले आहेत. लहान मुले, वृद्धमाणसं यात पडतात. प्रशासनाला विनंती लवकरात लवकर रस्ताकाम पुर्ण करावे हि नम्र विनंती.

आरुण पवार ,गुरुकृपा मेडिकल आणि जनरल स्टोअर्स पाटोदा

मो.नं.९४२३४७१८२८

माझे गुरूकृपा मेडिकल आणि जनरल स्टोअर्स असुन आधीच दुकानासाठी वेळ कमी त्यात पावसाने पाणी साचल्यामुळे रस्ता बंद, लोकांना त्रास होतो , प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी.

अविनाश जाधव , कापड दुकानदार

मो.नं.९४२३४७१८२८

माझे बालाजी क्लाथ सेंटर नावाचे दुकान आहे, त्याचबरोबर घरीसुद्धा आहे, परीवार मोठा आहे, रस्ता नसल्यामुळे येण्याजाण्याची अडचण आहे. त्वरीत रस्ता काम पुर्ण करावे.

डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते बीड

स्थानिक गुत्तेदारांच्या स्वार्थीपणामुळे काम बंद पाडले गेले आहे, लोकप्रतिनिधी आ.बाळासाहेब आजबे , तसेच आ.सुरेश आण्णा धस यांनी लक्ष द्यावे आणि परळी येथील तिरुपती कन्स्ट्क्शनचे ठेकेदार केशव आघाव हे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे ऐकण्यातील असल्याने त्यांना पालकमंत्र्यांनी प्रेमळपणे समजुन सांगून आठ दिवसात रस्ता पुर्ण करावा आणि व्यापारी ग्राहक , निवासी रहिवासी, वैद्यकीय व्यावसायिक, आणि एकेरी रस्त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी जिल्हाधिकारी बीड मार्फत पंतप्रधान, केंद्रीय मंत्री नितिन गडकरीजी , मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, आरोग्य मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे पाठवले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post पाटोदा: जवळाला ग्रामपंचायत यांच्या वतीने ऊसतोड मंजूराना मोफत किराणा सामान किट वाटप
Next post बीड: पत्रकार संभाजी मुंडे यांच्यासह कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला , हल्ल्यात तिघे जखमी; परळीत उपचार सुरू