औरंगाबाद: केंद्राच्या लाभासाठी सोयगाव तालुक्यात बँकांसमोर गर्दी ,बँकांना छावणीचे स्वरूप

सोयगाव:आठवडा विशेष टीम―
केंद्र शासनाच्या विविध लाभाच्या योजनेचा निधी पदरात पाडून घेण्यासाठी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोयगाव तालुक्यातील प्रत्येक बँकेच्या शाखांसमोर नागरिकांची गर्दी पहावयास मिळाली आहे.या गर्दीमुळे मात्र खुद्द नागरिकांनीच सामाजिक अंतर नियमाचे भान पाळले,मात्र बँकेच्या कर्मचाऱ्यांना रक्कम देतांना मोठा त्रास सहन करावा लागला होता.नुकताच झालेल्या अवकाळी पावसामुळे वीज पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्याने रात्री झालेला बिघाड दुरुस्त करण्याचे काम महावितरण मंडळाने सोमवारी पहाटेपासून हाती घेतल्याने बँकेचा कारभार वीज पुरवठ्याअभावी ठप्प झाल्याने नागरिकांना मात्र सामाजिक अंतर पाळत उन्हात उभे राहावे लागले होते.
कोविड-१९ साठी नागरिकांना तातडीची मदत व्हावी यासाठी केंद्र शासनाच्या वतीने सन्मान योजना,संजय गांधी निराधार योजना,अंध अपंग,श्रावण बाळ योजना आणि उज्ज्वला गॅस अनुदान आदि योजनांच्या निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे.या निधीची रक्कम काढण्यासाठी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी गर्दी केली होती.यामध्ये मात्र आलेल्या खातेदारांना बँक कर्मचाऱ्यांनी रांगेत उभे करून बँकेत प्रवेश करण्यापूर्वी त्यांच्या हातावर स्वच्छ पाणी ओतूनच बँकेच्या खिडकीमध्ये प्रवेश दिल्या जात होता.मात्र अवकाळी पावूस आणि वादळी वाऱ्याने रात्री विस्कळीत झालेला.