पाटोदा: ग्रामसेवक,तलाठ्यांच्या याद्यांचा घोळ , ऊसतोड मजुरांच्या आयुष्याचा खेळ, गटविकास अधिकारी म्हणतात एकही मदतीपासून वंचित राहणार नाही –डॉ.गणेश ढवळे

पाटोदा दि.१२:आठवडा विशेष टीम―पाटोदा तालुक्यातील मौजे सौंदाना येथिल ऊसतोड मजुरांच्या पोटाचा प्रश्न काही सुटण्याचे नाव घेत नाही, यादित नाव नसल्यामुळे मोफत किराणा किट वाटप पासून वंचित, गटविकास अधिकारी पं. स. पाटोदा नारायण मिसाळ यांना विचारणा केली असता २० तारखेनंतर आलेला एकही ऊसतोड मजूर मोफत किराणा किट पासून वंचित राहणार नाही,ज्यांची नावे यादित नसतील ती फेर-तपासणी करून कीट देण्यात येईल.
“१८ दिवस झाले गावाबाहेर राहुन, तलाठी एकही दिवस आम्हाला भेटायला सुद्धा आले नाहीत.”―सुप्रिया संभाजी वाघमारे
“मोफत कीराणा कीट दिलेच नाही, ३ लहान मुले आहेत. यादित नावंच नाही म्हणतात सरपंच , ग्रामसेवक. तलाठी आलेच नाहीत.“―दिक्षा सुखदेव वाघमारे
“यादित नावच नाही म्हणून मोफत किराणा किट मिळाले नाही.” ―ज्योती दिलीप वाघमारे
“ग्रामसेवक म्हणाले एका कुटुंबात एकालाच तुमच्या वडीलांना मिळाले आहे. आमच्या कुटुंबात ४ माणसं आहेत, मुलबाळं आहेत,त्यांना कसं जगवायचं” ―निशा नितीन वाघमारे
“मोफत किराणा किट भेटलेच नाही . उपसरपंच म्हणाले तुम्ही २० तारखेच्या अगोदर आलात म्हणून तुम्हाला मिळणार नाही.२० तारखेच्या नंतर आलेल्या ऊसतोड मजूरांनाच मिळेल.”―पप्पु विश्वंभर वाघमारे
नारायण मिसाळ , गटविकास अधिकारी पंचायत समिती पाटोदा
सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती पाटोदा नारायण मिसाळ यांना विचारणा केली असता यादितील नावे मागे, पुढे झाली असतील, एकही ऊसतोड मजूर मोफत किराणा किट वाटप पासून वंचित राहणार नाही. ३ तारखेला पहीली आता काल दुसरी यादी जाहीर झाली आहे.असे सांगितले.