अहमदनगर: परराज्यातील मजुरांना त्यांच्या मुळगावी जाण्याकामी जिल्ह्यातील चार बसस्थानकात एक खिडकी कक्ष कार्यन्वित

अहमदनगर, दि.१२:आठवडा विशेष टीम― अहमदनगर जिल्हयात अडकलेल्या परराज्यातील मजुरांना त्यांच्या मुळगावी जाण्याकामी तारकपूर बसस्थानक अहमदनगर, पारनेर बसस्थानक, श्रीरामपूर बसस्थानक, आणि कोपरगांव बसस्थानक या चार ठिकाणी एक खिडकी कक्ष कार्यन्वित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.त्यासाठी, महसुल,मोटार वाहन, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणारी समिती गठीत करण्यात आली आहे. नायब तहसीलदार (महसुल), मोटार वाहन निरिक्षक, आगार व्यवस्थापक आणि वैदयकिय अधिकारी यांचा या समितीत समावेश असेल.
ही समिती एक खिड़की कक्षांतर्गत खालील प्रमाणे कार्यवाही करणार आहे. यामध्ये, परराज्यात जाणा-या मजुरांची नोंद घेऊन त्यांच्या राज्यनिहाय याद्या तयार करणे, त्यास मान्यता देणे आणि मान्यता प्राप्त यादीतील मजुरांची वैदयकिय अधिकारी यांच्यामार्फत स्क्रिनिंग करणे व त्यांना प्रमाणपत्र देणे आदी जबाबदारी असणार आहे.
याशिवाय, मजुरांच्या संख्येनुसार सामाजिक अंतर (5ocial distancing) चे पालन करुन बसेसची संख्या निश्चित करणे, आगार व्यवस्थापकांनी तात्काळ मोफत बसेस उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करणे, प्रवाश्यांना मास्क व सॅनिटायझर उपलब्ध असल्याची खात्री करणे, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मार्फत मजुरांना राज्याच्या सीमेवर सोडण्याची कार्यवाही करणे आदी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
कोणतीही व्यक्ती / संस्था / संघटना यांनी उक्त आदेशाचे उल्लघन केल्यास भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनिय / कायदेशीर कार्यवाहीस पात्र असतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post औरंगाबाद: शहरात 26 रुग्णांची वाढ, जिल्ह्यात 653 कोरोनाबाधित
Next post पाचोऱ्यातील विघ्नहर्ताचे डॉ भूषण मगर डॉ सागर गरुड सह सर्व टीम कोविड सेंटर मध्ये सक्रिय होतेच पण आता खाजगी डॉक्टरांनी देखील सेवा देण्याचे धाडस दाखविले