बीड जिल्हाराजकारणहेल्थ

बीड जिल्ह्याच्या विकास चळवळीसाठी सामान्य जनतेची साथ व आशिर्वाद मला हवाय- मंत्री पंकजा मुंडे

मानवी जीवाच्या आरोग्य रक्षणासोबतच मुक्या प्राण्याच्याही आरोग्यासाठी पुढे येणारा पालकमंत्री जिल्ह्यानं पाहिला-आ.सौ.संगिताताई ठोंबरे

अंबाजोगाई दि.३: बीड जिल्ह्याचं पालकत्व करताना मी प्रत्येक मानवी जीवाच्या कल्याणासाठी वर्षानुवर्षे टिकतील अशा मुलभुत सुविधा उपलब्ध करून देत आहे.विकासाचे आकडे माझे मलाच कळत नसले तरी हा जिल्हा सर्वांगिण प्रगतीपथावर जावा असे मला वाटते. उद्‌घाटन करायला वेळ मिळत नाही याचाही मला आनंद वाटतो.मात्र ठरवलं तर रोज 500 कोटीच्या कामाचे उद्‌घाटन होतील एवढी विकास चळवळ उभा राहिली आहे. मला फक्त विकासाचं राजकारण कळतं. मात्र विरोधक माझा दौरा जाहिर झाल्यानंतर अगोदर उद्‌घाटन करतात हा बालिशपणा नाही का? हा सवाल त्यांनी केला.अंबाजोगाई शहर आणि रूग्णालयासाठी मी चार वर्षात दिडशे कोटीपेक्षा अधिक निधी दिला असुन केज मतदारसंघाला झुकते माप दिल्याचे सांगुन ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई गोपीनाथ मुंडेंनी केवळ सामान्य जनतेची सेवा करण्यासाठी मला ताकद आणि आशिर्वाद द्या असे आवाहन केले.दरम्यान जनतेच्या आरोग्य रक्षणासोबत मुक्या प्राण्याच्या आरोग्याची काळजी घेणारा बीड जिल्ह्याला लाभलेला पालकमंत्री हा आमचं भाग्य असल्याचं आ.संगिताताई ठोंबरे यांनी सांगितलं.

येथील विविध विकासकामाच्या शुभारंभ व उद्‌घाटनप्रसंगी मंत्री महोदय बोलत होत्या.परळीहुन शहरात आगमन झाल्याबरोबर त्यांनी साठे चौकात यशवंतराव चव्हाण चौक ते संत भगवानबाबा चौकापर्यंत जाणाऱ्या प्रमुख रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ, नागरी आरोग्य केंद्र इमारतीचे उद्‌घाटन आणि तालुका लघु पशुचिकित्सालय इमारतीचं उद्‌घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.संगिताताई ठोंबरे या होत्या.पशुचिकित्सालय परिसरात झालेल्या कार्यक्रमात मंत्री महोदयाचे स्वागत विभागाच्या वतीने झाल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पशु संवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ.एस.सी.खंडाळीकर यांनी केलं.या कार्यक्रमात अंबासाखर कारखान्याचे चेअरमन रमेश आडसकर म्हणाले की, बीड जिल्ह्यात मागच्या पन्नास वर्षात जो विकास झाला नाही तो अवघ्या चार वर्षात पंकजाताईच्या माध्यमातुन पुर्ण झाला. या परिसरात रूग्णालय असो किंवा इतर शहर विकासासाठी कोट्यावधी रूपायाचा निधी देणाऱ्या एकमेव पालकमंत्री असल्याचं त्यांनी जाहिरपणे सांगितलं. आ.संगिताताई ठोंबरे यांनी बोलताना सांगितलं की, या मतदारसंघात सामान्य जनतेच्या आशिर्वादाने संधी मिळाल्यानंतर ना.पंकजाताई आणि खा.डॉ.प्रितमताई यांच्या मार्गदर्शनाखाली मी अहोरात्र विकासाच्या प्रश्नावर परिश्रम घेते.ना.पंकजाताईमुळे शहरात आणि रूग्णालय परिसरात करोडो रूपये विकासाच्या योजना आल्या हे सांगताना त्यांनी न्यायालय इमारत, रूग्णालय परिसरातील इमारती व पायाभुत सुविधा, शहरातील प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण अशा योजनांची माहिती दिली. उपस्थित जनसमुदायासमोर आपल्या भाषणात पुढे बोलताना पालकमंत्री ना.पंकजाताई म्हणाल्या की, या जिल्ह्याला हक्काचे आणि घरचे नेतृत्व मिळाले.त्यामुळे प्रत्येक प्रश्नाची विशेष दखल मी घेते. माणसाच्या जीवनाशी निगडीत सर्व पायाभुत सुविधा उपलब्ध करून देण्यावर माझा भर आहे. मला राजकारण विकासाच्या प्रश्नावर नको आहे. तरी पण आमचे विरोधक मी केलेल्या कामाचे उद्‌घाटन माझ्या अगोदर एक दिवस जावुन करतात.हा केवळ बालिशपणा असल्याचा आरोप त्यांनी नाव न घेता केला.विरोधकांच्या डोक्यात ताप असाही उल्लेख करून त्यांनी टिका केली.रूग्णालयातील साधन सुविधा आणि इमारतीसाठी 131 कोटी रूपये आपण दिले.अंबाजोगाई नगर परिषदेला सुमारे 34 कोटी रूपये विकासासाठी दिल्याचे सांगुन त्यांनी जिल्ह्यात रस्त्याच्या कामासाठी 2200 कोटी रूपायांचा निधी आल्याचे सांगितले. माझी भुमिका समजुन घ्या.मला सामान्य जनतेसाठी काम कराययचं आहे आणि हे करताना तुम्ही आशिर्वाद आणि खंबीर साथ द्या. केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार असुन नुकताच जाहिर झालेला अर्थसंकल्प सामान्य जनतेच्या व शेतकऱ्यांच्या कल्याणाचा असल्याचेही त्यांनी सांगितले. हे शहर माझं आजोळ असुन त्या भावनेतुन कुठल्याही प्रश्नावर मी सहकार्य केल्याशिवाय राहणार नाही हे त्यांनी आवर्जुन सांगितलं.व्यासपीठावर महिला आयोगाच्या सदस्या सौ.गयाताई कराड, नेताजी देशमुख, कमलाकर आण्णा कोपले, गणेश कराड, हिंदुलाल काकडे, नारायण केंद्रे, संजय गिराम, अविनाश मोरे, बिभीषण गित्ते, ऍड.सतिश केंद्रे, दिलीपराव काळे, विलास जगताप, सुरेश कराड, डॉ.अतुल देशपांडे, हणुमंत तौर, संजय गंभीरे, रमाकांत बापु मुंडे, बालासाहेब शेप, मदन परदेशी, संतोष काळे, मोहन आबा आचार्य, महादु फड, महेश शेप यांच्याशिवाय कार्यकारी अभियंता भंडे, उपअभियंता मार्कंडेय, शाखा अभियंता पी.सी.पाटील, याशिवाय पशुसंवर्धन खात्यातील सर्व अधिकारी व अन्य प्रमुखांची उपस्थिती होती. याच कार्यक्रमात सीएम चषक अंतर्गत पारितोषिक मिळवणाऱ्यांना प्रमाणपत्र आणि पशुसंवर्धन विभागाअंतर्गत पालक शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राम कुलकर्णी आणि डॉ.आघाव यांनी केले.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.