लिंबागणेश येथिल भिमनगर दलित वस्ती मध्ये भिषण पाणीटंचाई, पं.स.सदस्य माने यांचे आश्वासन , २ दिवसात दुरूस्ती करून देण्यात येईल― डॉ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम― बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथिल भिमनगर वस्ती ७० कुटुंब , सांडपाणी ग्रामपंचायतीच्या नळावाटे येते परंतु भायाळा साठवण तलावातील पाणी पुरवठा करणा-या मुख्य जलविहीनीला ,३ ठिकाणी डॉ.सुदर्शन वाणी यांच्या आई हांस्पिटल समोर, वायभट वस्ती समोर आणि पोखरी येथिल बाबर वस्तीमधिल उकांड्यामध्ये पाईप लाईन लिक असल्यामुळे दुषित पाणी पुरवठा गावाला होतो, त्यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. म्हणून खबरदारी म्हणून ग्रामस्थ सांडपाण्यासाठी वापर करतात,तसेच नाल्यामध्ये घाण साचल्याने आजारपणाचे प्रमाण वाढल्याचे विद्यमान ग्रां.पं.स.श्रीहरी निर्मळ यांनी सांगितले.

श्रीहरी दादा निर्मळ , ग्रा.पं.सदस्य

मी या भागातील ग्रां.पं.स.असून जलशुद्धीकरण प्रकल्प अपुर्ण असल्याने शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध नाही, ४ एप्रिल रोजी ४० लोकांच्या सह्याचे निवेदन ग्रामविकास अधिकारी तेलप यांना देऊन हातपंप व बोअरवेल ची मागणी केली होती, परंतु अद्याप काहीच उपाययोजना केली नाही.

लेनाजी गायकवाड ,मो.नं.९५७९२३८०३२

भिमनगर वस्ती मधिल हातपंपाला भरपूर पिण्यायोग्य पाणी आहे,जर हातपंप दुरुस्ती केली तर भिमनगर वस्ती मधिल माताभगिनींची पायपीट थांबू शकते.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटु शकतो.

बबन माने , पं.स.सदस्य लिंबागणेश मो.नं.८८८८३५२१३५

डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी भिमनगर मधिल हातपंप दुरुस्तीची मागणी पं.स.बबन माने यांना केली असता २ दिवसात दुरुस्तीसाठी गाडी पाठवून देत असल्याचे सांगितले.

तेलप पी.जे.ग्रामविकास अधिकारी ,ग्रामस्थांनी स्वच्छता राखायला हवी

आज सकाळी पवन मेडिकलचे मालक प्रल्हाद जाधव यांनी ग्रामविकास अधिकारी तेलप यांना मेडीकल समोरील नाली प्लास्टीक, कचरा आदिने तुंबल्याचे सांगितले तेव्हा तेलप यांनी हा कचरा दुसरे तिसरे कोणी केला नसुन ग्रामस्थांनीच केला आहे, त्यामुळे ती जबाबदारी ग्रामस्थांची असल्याचे सांगितले.

डॉ.गणेश ढवळे मो.नं. ९४२००२७५७६ ,सामाजिक कार्यकर्ते बीड

तेलप ग्रामविकास अधिकारी यांनी जरी ग्रामस्थांना त्यांची कर्तव्ये पार पाडण्याची मोलाची सुचना केली असली तरी गावाला होणारा दुषित पाणी पुरवठा व नाली सफाई न केल्यामुळे पसरणारी रोगराई व त्यासाठी प्रशासनाने १४ वर्मा वित्त आयोगाच्या निधीतून खर्च करण्याची दिलेली परवानगी या त्यांच्या कर्तव्याविषयी मात्र ते विसरताना दिसतात अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांमधुन उमटत आहे.या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी लेखी मागणी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर व भिमनगर मधिल पुरुष -महिलांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post सुशिक्षित बेरोजगार युवकांना उद्योजक बनण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा एक ते पन्नास लाख रूपय पर्यंत प्रोत्साहन योजनेचा लाभ घ्यावा - दिपक घुमरे
Next post परळी औष्णिक विद्युत केंद्रातील बंद संच सुरू करण्यासह विविध विषयी धनंजय मुंडे यांनी साधला ऊर्जा विभागाच्या मुख्य सचिवांशी व्हीडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद