कॉरोना योद्धे यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार ; घरी रहा, सुरक्षित रहा –रामनाथ मंडलिक

औरंगाबाद:आठवडा विशेष टीम―औरंगाबाद शहरात दिवसेंदिवस कॉरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढतच चालला असून आज पर्यंत शहरात 600 पेक्षा जास्त कॉरोना रुग्ण वाढळून आले आहे, शहराची ही परिस्थिती पाहता राज्य शासनाने औरंगाबाद जिल्हा रेड झोन मध्ये विभागणी केली आहे.
आणि याच कारणामुळे औरंगाबाद महानगर पालिकेचे सर्वच कामगार या कॉरोना मध्ये शहरात आपले काम चोख पध्दतीने करत असतात दिसून येते आहे आणि शहराची स्वच्छता ठेवत आहे त्यांच्या या कार्याची दखल युवा स्वाभिमान पार्टी चे जेष्ठ नेते रामनाथ मंडलिक यांनी महानगरपालिका प्रभाग इ च्या अधिकारी सौ चव्हाण मॅडम, सुपरवायझर आणि प्रभागातील कामगाराचे आज कॉरोना चे नियम पाळून त्यांना गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या कार्यला शुभेच्छा दिल्या,यावेळी मंडलिक यांनी महानगरपालिका कामगार यांच्या विशेष कार्यची दखल घेत लवकरच त्यांच्या कुटुंबाला कॉरोना रागाच्या लॉग डाउन मध्ये काही गरज पडली तर अहोरात्र साथ देऊ असा विश्वास देऊन घरी रहा सुरक्षित रहा असा संदेश दिला, यावेळी सर्व कामगारांणी त्यांचे आभार मानले.
मंडलिक साहेब यांच्या सोबत सामाजिक कार्यकर्ते नारायण खोसे, आत्मराम ठुबे,विजय गायकवाड, कैलास रिठे,जन क्रांती संघ अध्यक्ष संदीप घुगरे,संजय फटकडे यांनी साथ दिली.