औरंगाबाद: सोयगाव तालुका आज शंभर टक्के बंद , महसूल आणि पोलीस प्रशासनाचे आदेश

सोयगाव,दि.१४:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सिल्लोड तालुक्यात कोविड-१९ चा शिरकाव झाल्याने सोयगाव तालुक्याला हादरे बसले असल्याने शुक्रवारी तालुका शंभर टक्के बंदचा आदेश तातडीने सोयगाव पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी सायंकाळी उशिरा काढला आहे.पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी सोयगाव तालुका बंद ठेवण्यात येणार आहे.
तालुक्याला लागुनच असलेल्या सिल्लोडला कोविड-१९ चा शिरकाव झाल्याने सोयगाव तालुका हादरला आहे.त्यामुळे जिल्हा आंतरजिल्हा नाक्यांवरील बंदोबस्त वाढविण्यात आला असून शुक्रवारी तालुक्यात अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त कोणत्याही आस्थापना सुरु राहणार नसल्याचा तातडीचा आदेश गुरुवारी सायंकाळी काढण्यात आला आहे.

सोयगावला खळबळ-

सिल्लोडला कोविड-१९चा शिरकाव होताच सोयगावला खळबळ उडाली आहे.त्यामुळे गुरुवारी रात्रीपासूनच सोयगाव तालुक्यात यंत्रणा सतर्क झाल्या आहे.शुक्रवारी तालुका शंभर टक्के बंद पाळण्यात येणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *