औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

औरंगाबाद: सोयगावच्या ग्रामीण भागात कोविड-१९ चा शिरकाव होऊ नये यासाठी जिल्ह्यापासून यंत्रणा सतर्क ,मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांची माहिती

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सिल्लोड पर्यंत आलेला कोविड-१९ कोणत्याही परिस्थितीत सोयगावला शिरकाव होऊ नये यासाठी जिल्हा पातळीवरून आता सोयगाव कडे नजरा वळल्या आहेत.त्यामुळे दि.१७ मे च्या टाळेबंद परिस्थितीचा अंदाज घेवून सोयगाव तालुक्ल्यात पुढील उपाय योजनासाठी प्रशासन सतर्क करण्यात येईल संक्रमणाची संख्या हळूहळू ग्रामीण भागात पाय रोवत असल्याने जिल्हा प्रशासानावरून जिल्ह्यात ज्या ठिकाणी कोविड-१९ अद्यापही पोहचलेला नाही त्या तालुक्यांची मोठी काळजी घेण्याबाबत जिल्हा स्तरावरून योजना हाती घेण्यात येत आहे.तसेच तातडीने सोयगाव तालुक्यात अडकलेल्या परराज्यातील मजुरांना त्यांच्या इच्छुक ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबतच्या हालचाली साध्या गतिमान करण्यात आल्या आहे.परंतु परजिल्ह्यातून व राज्यातून येणाऱ्यांची संख्याही तितकीच वाढती असल्याने त्यांचेवर मेहेर नजर ठेवणार असल्याची माहिती मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदवले यांनी गुरुवारी सोयगावला पत्रकार परिषदेत दिली आहे.
सिल्लोडला कोविड-१९ पोहचल्यानंतर तातडीने जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदवले यांनी सोयगाव तालुक्यातील उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी पंचायत समिती कार्यालयाला त्यांनी आढावा बैठक घेतली गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे,समाज कल्यान सभापती मोनाली राठोड यांनी सोयगाव तालुक्यातील उपाय योजनांचा आढावा दिला.कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर मजुरांच्या हातांना कामे मिळावी म्हणून ग्रामपंचायत स्तरावर तातडीने रोजगार हमी योजनेच्या कामांना कोणत्या निकषातून कामे हाती घेण्यात येतील याचा कृति आराखडा तयार करून तातडीने मजुरांच्या हातांना कामे द्यावी अशा सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या आहे.
-------------------------
या आढावा बैठकीत गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे,समाज कल्यान सभापती मोनाली राठोड,विस्तार अधिकारी केवलसिंग पाटील,साहेबराव शेळके,बलराज पुरी,व्यंकटेश मामीलवाड,अभियंता नितीन वैद्य,उमेश पाटील,सुभाष जाधव,गजानन जोशी,आदींची उपस्थिती होती.
--------------------------
जरंडीला भेटी-
मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ ,मंगेश गोंदवले यांनी तातडीने जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील विलीगीकरण कक्षाची पाहणी करून तातडीने उपाय योजनांच्या सूचना दिलाय यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे यांनी कोविड-१९ चा आढावा सादर केला,तसेच जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदांच्या बाबतीत चर्चा करून जरंडीला पदे भरण्याबाबत आश्वासन दिले.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.