बीड: स्वातंत्र्योत्तर ७३ वर्षे एसटी बस न पाहिलेल्या फुकेवाडीकरांची कैफियत ―डॉ.गणेश ढवळे

बीड दि.१५:आठवडा विशेष टीमबीड तालुक्यातील मौजे फुकेवाडी ४५० लोकसंख्या, जादातर ऊसतोड मजूर , शेतकरी, डोंगरमाळरानातील रानमेवा विकुन पोट भरणारे , मुलभूत सुविधा रस्ते ,पाणी , दळणवळणाच्या सोयी सुविधा उपलब्ध नसुन एसटी बस साठि बीडला जायचे असेल तर ५ कि.मी. आठवडे बाजार लिंबागणेशला जाण्यासाठी ८ कि.मी. डोक्यावर ओझं घेऊन चालत डोंगर पार करावा लागतो.

अंजली अंबादास मानकर :

आम्हाला लांबुन विहीरीवरून पिण्याचे पाणी शेंदुन आणावे लागते, दिवस पाणी आणण्यातच जातो, नळयोजना नाही,सरकारनी आम्हाला घरपोच नळयोजना द्यावी.

देवईबाई सत्यबा मानकर :

गावातील बोळिमध्ये सिमेंट रस्ता नाही,रात्री अपरात्री दगडाला ठेच लागून म्हतारी माणसं पडतात.आम्हाला गावांमधील बोळ्यमधे सिमेंट रस्ता करूज द्यावा.

बाबासाहेब शंकर पवार :

आम्हाला आठवडे बाजार लिंबागणेशला जाण्यासाठी ८ किलोमीटर चालत जावं लागतं, बाजारात विक्री साठी आंबे , सिताफळ , बोरं, करवंद , लिंब , डोक्यावर ओझं घेऊन पायपीट करावी लागते.आम्हाला डांबरी रस्ता पाहीजे.

बबन आश्रुबा मानकर:

आमची रस्त्याची अडचण आहे, एसटी बस येत नाही, बीडला जायचं म्हणलं तर ५ कि.मी.आणि लिंबागणेशला जाण्यासाठी ८ किमी डोंगर चढलल्यावर एसटी बस मिळते.

डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते लिंबागणेश:

२ वर्षांपूर्वी फुकेवाडीकरांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन केले होते, तेव्हा खडकाळ रस्त्यावर मुरूम काम झाले होते. परंतु अद्याप डांबरीकरण करण्यात आले नाही, पाण्यासाठी उन्हाळात भटकंती करावी लागत आहे, पाणीपुरवठा योजना नाही, बहुतांश ऊसतोड मजूर म्हणून साखर कारखान्यावर पोट भरण्यासाठी जातात. रस्ते , नळ योजना , पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे सार्वजनिक विहीर मिळावी यासाठी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी मुख्यमंत्री, रस्ते वाहतूक मंत्री , ग्रामविकास मंत्री , सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन ई-मेलद्वारे पाठवले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post परळीचे भूमिपुत्र अनिलकुमार गित्ते यांची सामाजिक संवेदना ; पुणे येथे स्पर्धा परीक्षाच्या विद्यार्थ्यांना 25 मार्च पासून मोफत जेवण आजतागायत सुरू
Next post कँसरवर मात करून साडे सहा एकरात घेतले सेंद्रिय केळीचे उत्पादन ; विभागीय कृषि संचालक डॉ.डी.एल.जाधव,राजेसाहेब देशमुख यांचेकडून सेंद्रिय केळींची पहाणी