पाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमीशेतीविषयक

पाटोदा: ढाळेवाडी येथील ऊसतोड मजुर महिलेने मृत्यूशी झुंज देत सोडला प्राण

ऊसतोड मजुरांसाठी विमा व संरक्षण नाही-दत्ता हुले

पाटोदा:आठवडा विशेष टीम―दि.४ रोजी टेंभुर्णी येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर तालुक्यातील ढाळेवाडी येथील तीन ऊसतोड मजुरांच्या रिकाम्या बैलगाड्याना वाळूच्या टिप्परने धडक दिली होती, त्यामध्ये दोन बैलांचा मृत्यू झाला होता व सहा ऊसतोड मजुर गंभीर जखमी होते.
यामध्ये अत्यंत गंभीर जखमी असलेल्या ऊसतोड मजुर महिला सौ. अर्चना लक्ष्मण जगदाळे ह्या मणक्याला जखमी व रक्त वाहिन्यांचा संपर्क तुटल्याने त्या सी. एन. एस. हॉस्पिटल मंगळवेढा रोड सोलापूर येथे उपचार घेत होत्या, त्यांचा पायाला जखम झाली ऊसतोडहोती त्याची शास्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली.त्यानंतर रात्री रक्तदाब कमी झाल्याने त्यांना दहा मिनिटे रक्तदाबाचा जबर धक्का बसल्याने त्या गेले तीन दिवस कोमात होत्या.
दि.४ पासून औषधोपचार व शास्त्रक्रिया होत असताना,त्यांच्या अत्यंत कमी रक्तदाबामुळे डॉक्टर हतबल झाले होते, शेवटी दि.९ रोजी सकाळी त्यांनी मृत्यूशी झुंज देत प्राण सोडला, त्यांच्या पश्चात त्यांचे पती लक्ष्मण जगदाळे(४१) मुलगा भाऊ जगदाळे(१७)बाळू जगदाळे(१०)मुलगी रोशनी जगदाळे, व त्यांचे सासु सासरे असा परिवार आहे.
तालुक्यातील अत्यंत दुःखाची दुर्घटना असल्याने या अंत्यविधीला हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते,त्यामध्ये जेष्ठ नेते चेरमन रामकृष्ण बांगर, दीपक घुमरे(जिल्हाउपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस),राजाभाऊ देशमुख (शेतकरी नेते) मा.गणेश कवडे(तालुकाध्यक्ष काँग्रेस),सभापती तात्यासाहेब हुले (कामगार संघटना कार्यध्यक्ष) गावकरी ऊसतोड मजुर उपस्थित होते.
राजाभाऊ देशमुख यांनी श्रद्धांजली अर्पण करताना ऊसतोड मजुरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खेद व्यक्त केला, त्यांना शासनाची कुठली विमा योजना व संरक्षण नाही,त्यामुळे अनेक मजुरांचे कुटुंब उध्वस्त होत आहेत, त्याचबरोबर हुले बापु व दीपक घुमरे यांनी जगदाळे कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्याचे आव्हान केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button