ईटकुर व हिवरा येथे कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू ―जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड दि.१७:आठवडा विशेष टीम― ईटकुर ता.गेवराई व हिवरा ता.माजलगाव येथे कोविड - १९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आल्यामुळे केलेली प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जाहीर केले आहे.

जिल्हयात सध्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, इत्यादी बाधित भागातुन प्रवासी येत आहेत.

त्यामध्येे ईटकुर ता.गेवराई येथे मुंबईहुन दिनांक १० मे २०२० रोजी एक कुटुंब आले व आल्याबरोबर त्यांना दिनांक १० मे २०२० पासुन होम क्वारंटाईन करण्यात आले त्यानंतर दिनांक १३ मे २०२० रोजी आयसोलेशन वार्ड, जिल्हा रुग्णालय,बीड येथे दाखल करण्यात आले सदरील १२ वर्षीय पॉझिटिव्ह रुग्णाचे आई, वडिल यांचे थ्रोट स्वॅब नमुने निगेटिव्ह आढळुन आले.

हिवरा ता.माजलगाव येथे २ व्यक्ती (पती-पत्नी) हे दिनांक ०७ मे २०२० रोजी मुंबईहुन आले व त्यांना त्याच दिवशी जिल्हा परिषद हिवरा शाळा येथे क्वारंटाईन करण्यात आले त्यानंतर लक्षणे आढळुन आल्यावर संबंधितांना दिनांक १४ मे २०२० रोजी आयसोलेशन वार्ड, जिल्हा रुग्णालय,बीड येथे दाखल करण्यात आले. संबंधित पॉझिटिव्ह रुग्णाच्या पत्नीचा थ्रोट स्वॅब नमुना हा निगेटिव्ह आढळुन आला आहे .सध्या हे दोनही रुग्ण आयसोलेशन वार्ड जिल्हा रुग्णालय, बीड येथे दाखल असुन त्यांचेवर उपचार करण्यात येत आहेत.

तसेच त्याचे सर्व निकट सहवासीत (High Risk Contact), इतर सहवासित (Low Risk Contact) या शोध घेवुन त्यांना आयसोलेशन वार्ड मध्ये दाखल करून त्यांचे थ्रोट स्वब नमुने तपासणीस घेण्याची कार्यवाही चालु आहे.या आजाराचा प्रसार रोखण्याकरिता खालील प्रतिबंधात्मक उपाययोजना चालु करण्यात आल्या आहेत.

ईटकुर ता.गेवराई येथे १ रुग्ण कोबिड - १९ पॉझिटिव्ह आढळून आला असुन गावाच्या परिसरातील ३ किलोमिटर परिसरामध्ये ईटकुर, हिरापुर, शिंपेगाव, कुंभारवाडी ता.गेवराई, खामगाव, नांदुरहवेली, पारगाव जप्ती ता बीड मध्ये येत असुन त्याठिकाणी कॉन्टेनमेंट झोन जाहिर करण्यात आला असुन एकुण १४ टिम द्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे.यामध्ये एकुण ८४० घरे व ४७४० लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तर लोळदगाव, अंकोटा, शहाजानपुर चकला, मादळमोही, कृष्णनगर, पाडळसिंगी, टाकळगाव ता.गेवराई, आहेरचिंचोली, कामखेडा, पेंडगाव, हिंगणीहवेली, पारगावशिरस हि गावे ७ किलोमिटर परिसरात येत असुन त्याठिकाणी बफर झोन जाहिर करण्यात आला आहे.

हिवरा ता.माजलगाव येथे १ रुग्ण कोबिङ -१९ पॉझिटिव्ह आढळुन आला असुन गावाच्या
परिसरातील ३ किलोमिटर परिसरामध्ये हिवरा बु., गव्हाणथडी, काळेगावथडी, डुब्बाथडी, भगवाननगर ता.माजलगाव मध्ये येत असुन त्याठिकाणी कॉन्टेनमेंट झोन जाहिर करण्यात आला असुन ७ टिम द्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे .यामध्ये एकुण ८१८ घरे व ३३९७ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार
आहे. तर राजेगाव, सुर्डी नजीक, महातपुरी, वा धोरा, वाघोरातांडा, हि गावे ७ किलोमिटर परिसरात येत असुन त्याठिकाणी बफर झोन जाहिर करण्यात आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post बीड: शहरी भागात प्रभाग सुरक्षा समिती स्थापन करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांचे आवाहन
Next post कोरोनाला हरवूया,गरिबांना मदत करून ईद साजरी करूया―हकीम लाला पठाण यांचे आवाहन