आठवडा विशेष|प्रतिनिधी
दादर दि.०४: आज दादर मुंबई येथे ,भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश ची कार्यसमितीची बैठक पार पडली.भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने येणाऱ्या लोकसभा निवडणूक – २०१९ साठी राज्यातील प्रत्येक लोकसभा क्षेत्रात भाजप ओबीसी मोर्चा तर्फे ओबीसी मेळावे घेण्यात येणार आहेत. यासाठी आज पक्षाने राज्य पातळीवरील एक संयोजन समिती तयार केली आणि आज त्या समितीच्या राज्याच्या संयोजक पदी महामंत्री श्री संजयजी गाते यांची तरराज्याच्या सहसंयोजक पदी आज श्री धनराज गुट्टे यांची निवड करण्यात आली
वयाच्या 29 व्या वर्षी भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षाच्या महत्वपूर्ण समितीच्या राज्याच्या सहसंयोजक पदी धनराजजी गुट्टे सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षाने संधी दिली त्याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत.
सदरील निवड भाजप ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रभारी ,गुजरात चे माजी मंत्री ,आमदार शंकर सिंह चौधरी ,प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक ,प्रदेश अध्यक्ष विजयराव चौधरी आदी सर्व मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये झाली आहे.