जळगाव जिल्हाराजकारण

विकास कामांच्या जोरावर जनता पुन्हा निवडून देणार! -आमदार किशोर पाटील

पाचोरा येथे जनसंवाद कार्यक्रमाद्वारे ५९४ कोटी रुपयाच्या विकास कामांची माहिती

आठवडा विशेष|ज्ञानेश्वर धोंड़ू पाटील
पाचोरा दि.०४:- निवडणुकीपूर्वी मतदार बांधवांना विकास कामांची दिलेली वचने मी पूर्ण केली असून पाचोरा भडगाव मतदारसंघात आतापर्यंत ५९४ कोटी रुपयांचा निधी आणून सर्व क्षेत्रात विकासाचे भरीव कार्य केले आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत देखील जनताजनार्दन केलेल्या विकासकामांमुळे मला पुन्हा विधानसभेत पाठवतील असा विश्वास आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केला काल दिनांक ३ फेब्रुवारी रोजी निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात घेण्यात आलेल्या जनसंवाद कार्यक्रमात त्यांनी हा अश वाद व्यक्त केला मी जनतेचा सालदार असून त्यांनी ज्या विश्वासाने व आशेने मला मतदार संघाचे नेतृत्व सोपवले त्याचा हिशोब देणे मी माझे कर्तव्य समजतो त्यामुळेच मतदारसंघात प्रामाणिकपणे रस्ते शैक्षणिक क्षेत्र औद्योगिक क्षेत्र आरोग्य तसेच क्रीडा क्षेत्रातील विकास कामे केलेली आहेत विकास कामे केल्यामुळेच केलेल्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याचे धाडस मी करीत आहे महाराष्ट्रात प्रथमच होत असलेल्या अभिनव अशा या प्रकारचा जनसंवाद खासदाराने देखील घ्यावा आणि विकास कामे केली असतील तर त्याचा जनतेच्या दरबारात हिशोब बांधावा असे आव्हान देखील आमदार किशोर पाटील यांनी खासदार नाना पाटील यांना दिले आहे दिनांक 3 फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजता दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीस नाना वाघ यांनी प्रास्ताविकात किशोर आप्पा पाटील यांची राजकीय सुरुवात व जडणघडण तसेच विकास कामांचा लेखाजोखा सादर केला.
जनसंवाद या प्रश्नोत्तररूपी कार्यक्रमाच्या रचनेत भडगाव आणि पाचोरा तालुक्यातील सहा पत्रकारांनी किशोर आप्पा पाटील यांना प्रश्न विचारून त्यांच्या कामाविषयी माहिती जाणून घेतली या प्रश्नांना आमदार पाटील यांनी दिलखुलास उत्तरे दिली .मतदारसंघातील नागरिकांसाठी पायाभूत सुविधा पाण्याचे प्रश्न, रस्ते विकास, आरोग्य सेवा, नगरदेवळा येथील प्रस्तावित एमायडिसी प्रकल्प त्याचबरोबर कृषी विषयक प्रश्न तीर्थक्षेत्र विकास शैक्षणिक क्षेत्रातील योगदान समशान भूमी वाचनालय व्यायाम शाळा तसेच नवीन विज सबस्टेशन मंजुरी पाचोरा शहराचा नागरी विकास अशा विविध शेत्रातील विकास कामांचा पाठपुरावा मंजुरी काम मार्गी लावणे याविषयी लेखाजोखा आमदार किशोर पाटील यांनी यावेळी सादर केला दुष्काळी पार्श्‍वभूमीवर महत्त्वपूर्ण असलेल्या नदीजोड प्रकल्पाविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना आमदार किशोर पाटील यांनी जलसंपदामंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नाकर्तेपणामुळे जिल्ह्यातील महत्वपूर्ण असे नदीजोड प्रकल्पातील कामे रखडली असल्याचे त्यांनी सांगितले राज्यात महत्त्वाचे मंत्रालय असलेले नामदार महाजन यांना वार्षिक सात ते आठ हजार रुपयांचा निधी उपलब्ध असतो तर मला केवळ २ कोटी रुपयांचा आमदार निधी असताना नामदार एका आमदाराला का घाबरतात असा खोचक प्रश्न आमदारांनी यांनी व्यक्त केला मी कोणत्याही प्रकारच्या श्रेयासाठी नाही तर केवळ विकास कामांचा भुकेला असून माझ्या विरोधात सतरा गिरीश भाऊ जरी आडवे आले तरी ते माझा विजय रथ थांबणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी मिश्किल शैलीत मत मांडताना माझ्यामागे वाघ असल्याने मला कुणाची भीती नसल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखविले. यावेळी नगरदेवळा येथील प्रस्तावित एमायडिसी प्रकल्प आणि संभाव्य रेल्वे बोगी निर्माण कारखाना विषयी बोलताना या प्रकल्पाबाबत मी आशावादी असून योग्य पाठपुरावा केलेला आहे मात्र श्रेयाचे राजकारण करणाऱ्यांनी या कामात खोडा घातलं नाही तर मतदार संघात एक मोठा प्रकल्प उभा राहील शिवाय रोजगाराच्या संधी देशील मोठ्या प्रमाणावर निर्माण होणार असल्याचे सूतोवाच आमदार किशोर पाटील यांनी केले कार्यक्रमाला माजी आमदार तात्या पाटील विधानसभा संपर्कप्रमुख सुनील पाटील जि प गटनेते रावसाहेब पाटील शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील उपजिल्हाप्रमुख एडवोकेट दिनकर देवरे गणेश पाटील जीप सदस्य भुरा आप्पा उद्धव मराठे नगराध्यक्ष संजय गोहिल दिपक राजपूत तालुकाप्रमुख शरद पाटील विलास पाटील किशोर बारावकर बंडू चौधरी नगरसेवक सतीश चेडे बापू काटकर दादा भाऊ चौधरी राम केसवाणी जिभाऊ पाटील डॉक्टर भगवान सावंत रवी केसवाणी संजय कुमावत भरत खंडेलवाल गणेश परदेशी पप्पू राजपूत अजय जयस्वाल निर्मल स्कूलच्या चेअरमन सौ वैशाली ताई सूर्यवंशी सौ कमल ताई पाटील माजी नगराध्यक्ष सौ सुनिता पाटील स्वीय सहाय्यक राजेंद्र पाटील प्रवीण पाटील पंढरीनाथ पाटील संदीप राजे पाटील अनिकेत सूर्यवंशी शंकर गवळी भगवान घुले कडे वडगाव विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप केदार यांनी तर गणेश पाटील यांनी आभार प्रदर्शन केले


बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.