महाराष्ट्र राज्यहेल्थ

डॉ. श्रीगोपाल झंवर यांच्या शिवम नेत्रालयाला देशपातळीवरील संस्थेचे एनएबीएच प्रमाणपत्र प्रदान

आठवडा विशेष|प्रतिनिधी

परळी दि.०५ :परळी शहरातील नेत्ररोग तज्ञ तथा नेत्रशल्य विशारद डॉ. श्रीगोपाल झंवर यांच्या शिवम नेत्रालय व मॅटर्नीटी होमला देशपातळीवरील एनएबीएच या संस्थेचे गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले असून मराठवाड्यातील हे प्रमाणपत्र मिळविणारे शिवम नेत्रालय तीसरे हॉस्पीटल आहे. आवश्यक असलेल्या सर्व निकषांची पुर्तता व तपासणीनंतर असे प्रमाणपत्र दिले जाते. या रुग्णालयातील सर्व सुविधांचे मूल्यांकन करुन सदरचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. याबद्दल डॉ. झंवर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
एनएबीएच हे वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत महत्वाचे असलेले व देशपातळीवर दिले जाणारे गुणवत्ता प्रमाणपत्र परळी येथील डॉ. श्रीगोपाल झंवर यांच्या शिवम नेत्रालय व मॅटर्नीटी होमला प्रदान करण्यात आले आहे. रुग्णांना सर्वोत्तम व उत्कृष्ट दर्जाचे सेवा देणाऱ्या व त्या सेवेमध्ये सातत्य टिकवून ठेवणाऱ्या संस्थांना असे प्रमाणपत्र दिले जाते. प्रमाणपत्र मिळविण्यासाठी असलेले निकष अत्यंत कडक असून निकषाच्या पुर्ततेनंतरच एनएबीएच हे देशपातळीवरील गुणवत्ता प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते. शिवम नेत्रालय ही मराठवाड्यातील मोजक्या संस्थेपैकी प्रमाणपत्र मिळविणारी एक संस्था असून परळीसारख्या ग्रामिण भागातील रुग्णांना आता अधिक चांगली व दर्जेदार सेवा देणे शक्य होणार आहे.
अनेक कारणांनी रुग्णालयांना सर्व निकषांची पुर्तता करणे व सर्व नियम अटींच्या आधीन राहून रुग्णांना सेवा देणे शक्य होत नाही. महानगरातील चकचकीत व मोठ्या रुग्णालयाला असे प्रमाणपत्र मिळू शकते. परंतु आम्ही काही महिन्यांपुर्वी हे प्रमाणपत्र मिळवून जागतिक पातळीवरील नेत्रसेवा रुग्णांना देण्याचा संकल्प केला होता. सर्व निकषांची पुर्तता करुन हे यश आणि प्रमाणपत्र आम्हाला मिळाले. आमची रुग्णसेवा अधिक चांगली करु, असा विश्वास श्रीगोपाल श्रीझंवर यांनी व्यक्त केला.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.