जळगाव: पहुरपेठ जिल्हा परिषद शाळेच्या अॉनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी गुगल फाॅर्मची निर्मीती

जामनेर:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―संतोषीमातानगर पहूरपेठ जि. प. प्राथमिक शाळेने सन २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षांकरीता अॉनलाइन प्रवेश प्रक्रियासाठी गुगल फाॅर्मची निर्मीती केले आहे. शाळेतील तंत्रस्नेही आदर्श शिक्षक दिनेश दत्तु गाडे यांनी त्यांचे तंत्रज्ञान वापरून गुगल फाॅर्म तयार केलेला आहे.
सध्या संपूर्ण जगभरात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव चालू आहे. आणि या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लाॅकडाऊन सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने या संदर्भात आदेशान्वये शाळा बंद ठेवून शिक्षकांना *वर्क फ्राॅम होम* चे आदेश दिले आहेत.
या आदेशानुसार सन २०२०-२०२१ ची प्रवेश प्रक्रिया संकटात सापडली आहे. म्हणून या समस्येवर उपाय शोधून काढत जि. प प्राथमिक शाळा संतोषीमातानगर पहूरपेठ शाळेने *गुगल फाॅर्म* ची निर्मिती केली आहे. सध्या बहुतांश पालक मोबाईल वापरतात. पालक सदर गुगल फाॅर्म वर घरबसल्या माहिती भरून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करू शकतात. तसेच सदर माहिती भरताना काही अडचण आल्यास लिंकवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविणिरी तसेच विद्यार्थ्यांचे हित जोपासणारा शाळा म्हणून पहूरपेठ परिसरात संतोषीमातानगर जि.प. शाळेचा उल्लेख केला जातो. या शाळेची स्थापना ३ जून १९९९ रोजी झालेली आहे. शाळेत ६ उपशिक्षक व १ ग्रेडेड मुख्याध्यापक असे एकूण ७ शिक्षक कार्यरत आहे.शाळेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे गावातील पालक, पदाधिकारी, माता-पालक , शिक्षक -पालक, शालेय व्यवस्थापन समिती यांचे लक्ष व सहकार्य असल्याने शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागलेली आहे. विद्यार्थ्यांचे हित जोपासण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व सहकारी शिक्षक सतत प्रयत्नशील असतात. परिपाठाच्या वेळी मूल्यशिक्षणावर विशेष भर दिला जातो. दर शनिवारी सकाळी कवायत व व्यायामाचे प्रकार विद्यार्थ्यांना स्वतः मुख्याध्यापक करून दाखवतात व प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून करून घेतली जातात. "विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, हाच शाळेचा ध्यास". हे शाळेचे ब्रीदवाक्य आहे.
प्रोजेक्टरवर विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहिती दिली जाते. डिजिटल शाळा म्हणून शाळेला नावलौकिक आहे. शाळेला आयएसओ मानांकन प्रमाणपत्र मिळालेले आहे. ३०/११/२०१९ रोजी तंबाखुमुक्त शाळा म्हणून घोषीत करण्यात आली आहे. सन २०१९ पासून पहिली पासून सेमी वर्ग सुरू करण्यात आलेला आहे. दरवर्षी शैक्षणिक सहल काढली जाते. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वर्गशिक्षकांचे वैयक्तिक लक्ष असते. माता-पालक, शिक्षक-पालक सभेचे आयोजन करण्यात येते. शाळेत अनुभवी व उच्चशिक्षित शिक्षक आहेत. विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी लाभाच्या योजना शाळेत राबविल्या जातात.

विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांची फिराफिर तसेच कोणत्याही प्रकारची अडचण होवू नये यासाठी शासनाच्या तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अॉनलाइन गुगल फाॅर्मची निर्मीती केली आहे.
―दिनेश गाडे (उपशिक्षक)

अॉनलाइन प्रवेश प्रक्रिया यशस्वीपणे राबविण्यासाठी गुगल फाॅर्मची निर्मिती शाळेतील तंत्रस्नेही आदर्श शिक्षक दिनेश गाडे यांनी केली आहे. १०० टक्के पालक अॉनलाइन प्रवेश फार्म भरतील याचा मला आत्मविश्वास आहे. शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहू.
―पी.टी.पाटील (मुख्याध्यापक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post #CoronaVirus घाबरू नका परंतु काळजी घ्या,आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील नागरिकांना आ.बाळासाहेब आजबे यांचे आवाहन
Next post #CoronaVirus:केंद्रीय पोलीस दलाच्या दहा तुकड्या महाराष्ट्रात दाखल ; 5 RAF ,3 CISF आणि 2 CRPF तुकड्या दाखल