#CoronaVirus:केंद्रीय पोलीस दलाच्या दहा तुकड्या महाराष्ट्रात दाखल ; 5 RAF ,3 CISF आणि 2 CRPF तुकड्या दाखल

मुंबई:वृत्तसेवा― महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव, लॉकडाऊनचा काळ आणि पोलीस यंत्रणेवर या सर्व परिस्थितीमुळे येणारा ताण पाहता अखेर केंद्रीय पोलीस दलाच्या १० तुकड्या महाराष्ट्राच दाखल करण्यात आल्या आहेत. आज सोमवारीच राज्यातील विविध ठिकाणी सेवेत रुजू होणार आहेत. राज्यात दाखल होत असणाऱ्या या तुकड्यांमध्ये ५ रॅपिड अॅक्शन फोर्स, ३ तुकड्या CISF आणि CRPF च्या २ तुकड्या दाखल करण्यात आल्या आहेत.

दाखल करण्यात आलेल्या १ तुकडीत शंभर जवान आहेत. राज्यातील एकंदर परिस्थिती पाहता राज्य शासनाने एकूण २० तुकड्या मागवल्या होत्या, त्यातील १० तुकड्या सद्यस्थितीला केंद्राने पाठवल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई, पुणे, औरंगाबाद, मालेगाव, अमरावती इथे या तुकड्या तैनात करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सोलापूरमध्येही एक तुकडी पाठवण्याची मागणी होत आहे.

रमजान ईद, पालखी सोहळा, गणेशोत्सव या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि महाराष्ट्र पोलिसांना विश्रांती देण्यासाठी या तुकड्यांना राज्यात पाचरण करण्यात आल्या आहेत. राज्यात आलेल्या केंद्रीय पोलीस दलाच्या या तुकड्या कुठे तैनात करायच्या याचा अधिकार ज्या - त्या पोलीस आयुक्तांना दिले असल्याची माहिती समोर येत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post जळगाव: पहुरपेठ जिल्हा परिषद शाळेच्या अॉनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी गुगल फाॅर्मची निर्मीती
Next post धुळे: लाटीपाडा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडावे; मलांजन ग्रामस्थांचे निवेदन