धुळे: लाटीपाडा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडावे; मलांजन ग्रामस्थांचे निवेदन

पिंपळनेर (धुळे):आठवडा विशेष टीम― कोरोना विषाणूमुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात लॉकडाउन आहे. त्यामुळे सर्वच बंद असल्याकारणाने शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल त्याला कावडीमोल दराने विकावा लागत आहे. त्यातच दुष्काळात तेरावा महिनाम्हणून शेतात असलेले पीक जगवणे शेतकऱ्याला जिकिरीचे झाले आहे. वास्तविक, गेल्या वर्षी अतिवृष्टीसह भरपूर पाऊस पडूनही सद्यःस्थितीला पाण्याची दयनीय अवस्था झाली आहे. कारण भूगर्भात मूळ बेसाल्ट खडकावर संपूर्ण गावाचे शिवार आहे. बंधाऱ्यात अडवलेल्या पाण्यावर मार्च व एप्रिल महिन्यापर्यंत परिस्थिती बरी होती. पण आज स्थिती बिकट आहे. म्हणून लाटीपाडा धरणातून पाण्याचे आवर्तन प्रवाहीत करून ८ नंबर चारीद्वारे पाणी सोडावे, यासाठी मलांजन ग्रा. पं. पदाधिकारी, साक्री पंचायत समितीचे माजी सदस्य प्रकाश अकलाडे, उभरे गावचे सरपंच, शरद सोनवणे आदींनी उपअभियंता, सिंचन विभाग, पिंपळनेर यांना निवेदन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post #CoronaVirus:केंद्रीय पोलीस दलाच्या दहा तुकड्या महाराष्ट्रात दाखल ; 5 RAF ,3 CISF आणि 2 CRPF तुकड्या दाखल
Next post अंबाजोगाईत बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना नगरपरीषदेने जीवनावश्यक सेवा पुरवाव्यात― मनोज कदम,भीमसेन लोमटे,प्रमोद पोखरकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन