नवी दिल्ली:वृत्तसंस्था― देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु झाला आहेलॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मेपर्यंत लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊननंतरही देशात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. देशात मागील २४ तासात नवे ५२४२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. जे एका दिवसात आतापर्यंतचे आढळून आलेले सर्वाधिक रुग्ण आहेत. तर मागील २४ तासांमध्ये १५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ९६ हजार १६९ लोकाना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ३०२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ३६ हजार ८२४ लोक कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेतदरम्यान, भारतात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मागील तीन दिवसांमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा दर १३.६ दिवसांवर आला आहे. तर मागील १४ दिवसांत हा दर ११.५ वर होता. देशात रविवारी कोरोना व्हायरसचे जवळपास पाच हजार नवे रुग्ण समोर आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यानी सांगितले की, मृत्यूदरात घट होऊन ३.१ टक्क्यांवर आला आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून हा दर ३७.५ टक्क्यावर पोहोचला आहे.भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या १०६ दिवसांमध्ये ८० हजारावर पोहोचली आहे. तर ब्रिटन, इटलीस्पेन, जर्मनी आणि अमेरिकेला या संख्येवर पोहोचण्यासाठी ४४ ते ६६ दिवस लागले होतेआठ राज्यात आणि केंद्र शासित प्रदेश तसेचअरुणाचल प्रदेश, चंदिगढ, लडाख, मेघालयमिझोरम, पद्दचेरी आणि अंदमान निकोबार द्वीप समूह आणि ददरा आणि नगर हवेलीमध्ये मागील २४ तासांत कोरोनाचा कोणताही रुग्ण समोर आलेला नाही. सिक्किम, नागालँड, दमन आणि दीव, लक्षद्वीपमध्ये आतापर्यंत एकही रुग्ण आढळून आलेला नाही.