कोरोनाचा बीड जिल्ह्यात पहिला बळी ६५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू ; प्रशासनाच्या वतीने अंत्यसंस्कार

बीड दि.१८:आठवडा विशेष टीम― परवा पर्यंत एकही कोरोनाचा रूग्ण नसलेल्या बीड जिल्ह्यात काल सुरूवातीला दोघाजणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर सायंकाळी पुन्हा सात जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर जिल्ह्यातील यंत्रणा सतर्क झाली होती. परंतु यातील एका महिलेचा पहाटे उपचारा दरम्यान मृत्यु झाल्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी गेल्याची नोंद झाली असून सदर महिलेच्या मृतदेहावर प्रशासनाच्या वतीने बीड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तिसऱ्या लॉक डाऊनचा कालावधी काल १७ तारखेला रात्री १२ वाजता संपला. १६ तारखेपर्यंत बीडमध्ये कोरोनाचा एकही रूग्ण नसल्यामुळे बीड जिल्हा ग्रीनझोनमध्ये येणार असे वाटत असतानाच गेवराई आणि माजलगाव तालुक्यामध्ये एक एक कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण सापडल्यानंतर जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली होती. दरम्यान सायंकाळी पुन्हा सात जणांचे थेंटचे नमुने पॉझिटीव्ह आल्यानंतर जिल्हा यंत्रणा सतर्क झाली होती. आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथील एका मुलीचा विवाह नगर तालुक्यातील पिंपळगाव येथील तरूणासोबत झाला होता परंतु सदर तरूणाने गावातील मालमत्ता विकुन मुंबईमध्ये वास्तव्यास गेला होता. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे ते कुटूंब मुंबईतून बाहेर पडण्यास इच्छूक होते. त्यामुळे त्यानी एकही रूग्ण नसलेल्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असलेल्या पाटण येथे येण्याचा निर्णय घेतला. १४ तारखेला ते घनसोली येथुन पाटण येथे दाखल झाले होते. त्या सातही जणांचे स्वब तपासणीला पाठविल्यानंतर काल सायंकाळी ते कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर बीड येथे उपचार सुरू करण्यात आले होते. असे असताना मुलाच्या सासरवाडीत आलेल्या ६५ वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान पहाटे मृत्यू झाला. परवापर्यंत एकही रूग्ण नसलेल्या बीड जिल्ह्यात काल दिवसभरात नऊ रूग्णाची नोंद आणि एका रूग्णाचा मत्य झाल्यामळे खळबळ उडाली असून सदर महिलेवर प्रशासनाच्या वतीने बीड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रशासनाच्या वतीने अंत्यसंस्कार

६५ वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने सदर महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बीड येथील भगवानबाबा प्रतिष्ठानच्या स्मशानभूमीत सदर महिलेचा मृतदेह घेवून गेल्यानंतर प्रतिष्टाचा स्थानिकच्या नागरिकांनी त्या । ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यास विरोध दर्शविण्याची भूमिका घेतली. त्यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे बीड शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे पीआय यांच्यासह आरसीबीचे पथक स्मशानभूमीजवळ दाखल झाले होते. शेवटी विरोध करणाऱ्या लोकांना समजावून सांगत प्रशासनाने अंत्यसंस्कार केले. लोकांमध्ये कोरोनाची भिती निमाण झालेली असल्यामुळे अशा पद्धतीने विरोध झाल्यामुळे प्रशासनाने सुरूवातीलाच अंत्यसंस्काराचे ठिकाण शहराच्या बाहेर निश्चित केले असते तर विरोधाचा प्रश्न निर्माण झाला नसता आणि नागरिकांच्या मनात भितीही उत्पन्न झाली नसती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post देशात कोरोना बाधितांचा आकडा ९६ हजार पार; आतापर्यंत देशात ३०२९ रुग्णांचा मृत्यू
Next post उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद कायम; घेतली आमदारकीची शपथ