उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद कायम; घेतली आमदारकीची शपथ

मुंबई:आठवडा विशेष टीम― मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अखेरीस विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याच्या आधीच उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतल्याने ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपद राहणार की जाणार? याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.आज दुपारी १ वाजेच्या सुमारास उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यानंतर त्यांना विधानपरिषद सदस्यत्वाचं प्रमाणपत्रंही देण्यात आलं. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे याही उपस्थित होत्या. कोणताही गाजावाजा न करता मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. उद्धव ठाकरे यांनी २७ नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे त्यांना सहा महिन्याच्या आत कोणत्यातरी सभागृहाचं सदस्य होणं बंधनकारक होतं. २७ मे रोजी सहा महिने पूर्ण होत असल्याने त्यापूर्वीच ते विधानपरिषदेचे सदस्य झाल्याने मुख्यमंत्रिपदाचा पेच सुटला आहे. करोनाच्या संकटामुळे विधानपरिषदेची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post कोरोनाचा बीड जिल्ह्यात पहिला बळी ६५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू ; प्रशासनाच्या वतीने अंत्यसंस्कार
Next post धुळे: निकुंभे येथे हिंस्र बिबट्याने वासराचा पाडला फडशा ;बुरझड परिसरात दहशत, वन विभागाने पिंजरा लावण्याची मागणी