बीड जिल्हा

गुरुवारी आ.भीमराव धोंडे यांचे हस्ते विविध रस्त्यांचा भूमिपूजन समारंभ

आठवडा विशेष|प्रतिनिधी

आष्टी :लोकप्रिय, रस्तेमहर्षी आमदार भीमराव धोंडे यांचे हस्ते गुरुवार दि.७ फेब्रुवारी रोजी आष्टी तालुक्यातील विविध रस्त्यांचा भूमिपूजन समारंभ संपन्न होणार आहे
लोकप्रिय आमदार भीमराव धोंडे साहेब यांनी आष्टी मतदारसंघाचा गेल्या चार वर्षात रस्त्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर मार्गी लावला आहे प्रमुख रस्त्याला राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात व विशेष रस्ते दुरुस्ती कार्यक्रमात मोठी आर्थिक तरतूद करुन घेतली आहे ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांचे माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर मार्गी लावला आहे गुरुवार दि ७ फेब्रुवारी सकाळी १० वा वटनवाडी ते चोभानिमगाव २ कोटी रु रस्त्याचे
सकाळी १०.३० वा. नगर रोड ते प्राथमिक आरोग्य केंद्र कडा या २० लक्ष रु
त्याच प्रमाणे सकाळी ११ वा नगर बीड रोड ते शिरापुर या १कोटी ३० लक्ष रु रस्त्याचे भूमिपूजन मा.आ.भीमराव धोंडे यांचे हस्ते होत असुन या समारंभाला माजी आ.साहेबराव दरेकर जि.प.अध्यक्ष सविता गोल्हार सर्व जि.प.सदस्य प.स.सदस्य पदाधिकारी उपस्थित रहाणार असुन गेल्या अनेक दिवसांपासूनचा या रस्त्यांचा प्रश्न सुटला असुन या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे या समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन वटनवाडी चोभानिमगाव कडा शिरापुर ग्रामस्थांनी केले आहे

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.