धुळे: कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी बांधावर होणार खतांचे वाटप

धुळे:आठवडा विशेष टीम― तालुक्यातील निमखेडी येथील महिला बचत गटातील महिला व शेतकरी गटाच्या सदस्यांना वांधावर खतांचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय झाला.आमदार कुणाल पाटील, अश्विनी पाटील यांच्या हस्ते या मोहिमेला सुरुवात झाली. या वेळी उपविभागीय कृपी अधिकारी भालचंद्र वैसाणे, जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे, मंडळ कृपी अधिकारी महेंद्र वारुळे, उपसरपंच दत्तात्रय पाटील, माजी सरपंच सतीश पाटील, कृपी सहायक मधुकर सोनवणे, निरंजन साझुंखे, वापू सोनवणे, कुंडाणेचे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर शिसोदे, वरखडीचे माजी सरपंच ज्ञानेश्व मराठे, अशोक पाटील आदी उपस्थित होते. महिला वचत गटाच्या अनिता पाटील यांच्यासह अन्य एका शेतक-याला प्रातिनिधिक स्वरूपात खत देण्यात आली. आमदार कुणाल पाटील म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतर्फे शेतकऱ्यांना बांधावर बि-बियाणे, खते देण्याचा निर्णय झाला आहे. शेतकन्यांनी स्वत:ची काळजी घ्यावी. मास्कचा वापर करावा असेही ते म्हणाले. गणेश अॅग्रोचे संचालक साझुंखे यांनी निमखेडी येथे खताच्या गोण्या महिला वचतगट व शेतकरी गटाला दिल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post धनंजय मुंडेंनी अंबाजोगाईच्या स्वारातीला MRI मशीन मिळवून दिली
Next post धुळे: शहाद्यात भाजीपाला आडत व्यावसायिकांकडून बेमुदत बंदचा इशारा