#CoronaVirus नंदुरबार येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये फवारणी

नंदूरबार:आठवडा विशेष टीम― शहरातील कोरोना योद्धा (पोलीस कर्मी) यांना आपल्या नंदुरबार संस्थेद्वारा खारीचा वाटा म्हणून प्रतिकार क्षमता वाढविण्यातही आयुष्य मंत्रालयाने सुचविलेला काढा(५ दिवस) वितरित करण्यात आला.उपनगर पोलीस स्टेशन येथे ८५, नंदुरबार शहर ट्रॅफिक १८५ तसेच नंदुरबार तालुका पोलीस स्टेशन येथे १०५ पोलीस कर्मचाऱ्यांना काढा देण्यात आला. या वेळी एपीआय निळे, वाणी (ट्रॅफिक), पीआय पाटील, संस्थेचे सचिव डॉ. कृष्णा गांधी, विश्वस्त योगेशभाई पारेख, धनराज कातोरे, प्रशासकीय अधिकारी अनिल पाटील व सहयोगी उपस्थित होते. आपल्या कोरोना योध्याप्रती समाजाचे प्रेम पाहून भावनिक वातावरण निर्माण झाले होते. तसेच सचिव, डॉ. हेडगेवार सेवा समिती यांनी पोलीस कर्मी हे आपला जीव धोक्यात घालून समाजाचे रक्षण करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सुद्धा सोशल डिस्टन्स पाळून सहकार्य करावे, असे आवाहन केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post नंदुरबार: व्यवसायिकांना दुकानभाड्यात सवलत द्यावी, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
Next post औरंगाबाद: शेतकऱ्याने एकाच दिवसात वाटली ३०० क्विंटल मोफत केळी ,लॉकडाऊनमुळे भाव मिळत नसल्याने सोयगावात हा प्रकार