औरंगाबाद: शेतकऱ्याने एकाच दिवसात वाटली ३०० क्विंटल मोफत केळी ,लॉकडाऊनमुळे भाव मिळत नसल्याने सोयगावात हा प्रकार

सोयगाव,दि.१८:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
कोविड-१९ च्या लॉकडाऊनमुळे व्यापारी येत नसल्याने आणि भाव मिळत नसल्याने सोयगावातील केळी उत्पादक शेतकऱ्याने चक्क चौथ्या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी शेतातून नागरिकांनी मोफत केळी घेवून जाण्याचे आवाहन केले या आवाहनानंतर मात्र सोयगावात नागरिकांनी या शेतकऱ्याच्या मळ्यात केळी घेवून जाण्यासाठी रांगा लावल्या होत्या.भाव आणि व्यापारी यामुळे शेतकऱ्याने हा निर्णय घेतला होता.
सोयगावातील केळी उत्पादक शेतकरी बापू काळे यांनी चार एकर क्षेत्रावर शहराला लागुनच केळीची लागवड केली आहे.परंतु कोविड-१९ च्या सलग चार लॉकडाऊनमध्ये केळीचे बाजार अडकल्याने या शेतकऱ्याने चक्क मोफत केळी वितरण केली होती.दरम्यान केळी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून भाव कमी देवून केळी खरेदीची हमी दिल्या जात होती.दोनशे ते दोनशे पन्नास या भावात केळीची खरेदी करण्याची हमी व्यापाऱ्यांकडून देण्यात येत होती.त्यामुळे या त्रस्त शेतकऱ्याने अखेरीस नागरिकांना मोफत केळी वाटून देण्याचा निर्णय घेतल्याने पहिल्याच दिवशी नागरिकांना तीनशे क्विंटल केळी मोफत वाटली,दरम्यान लॉकडाऊनमध्ये केळीला विक्रीसाठी बाजारपेठच नसल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने हा निर्णय घेतला आहे.केळी लागवडीला मोठा खर्च आलेल्या या शेतकऱ्याचा या केळीचा पहिला पाडा केवळ १२७५ प्रती क्विंटल याप्रमाणे गेला होता,त्यानंतर मात्र व्यापारी २०० ते २५० रु प्रती क्विंटलप्रमाणे भाव देत असल्याने संभ्रमात पडलेल्या शेतकऱ्याने व्यापाऱ्यांना देण्याऐवजी नागरिकांना मोफत केळी वाटप केली.

केळी घेवून जाण्यासाठी सोमवारी शेतकऱ्याच्या मळ्यात नागरिकांनी मात्र रांगच रांगा लावल्या होत्या,त्यामुळे एकाच दिवसात तब्बल ३०० क्विंटल केळी चे घड नागरिकांनी मळ्यातून वाहून नेले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post #CoronaVirus नंदुरबार येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये फवारणी
Next post धुळे: जिल्हा कारागृहात फवारणी