सोयगाव,दि.१८:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगाव शहराच्या जवळच असलेल्या शेंदुर्णी आणि पाचोरा येथील दोन्ही खासगी डॉक्टरांचा सोमवारी सकारात्मक अहवाल प्राप्त झाला आहे.दरम्यान या दोन्ही खासगी डॉक्टरांच्या संपर्कात सोयगाव तालुक्यात पाच जण आले असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळताच खळबळ उडाली आहे.आरोग्य विभागाने संपर्कात आलेल्यांची यादी हस्तगत करून त्यांना तपासणी करून होमकोरोटाईन केले आहे
शहरापासून ०७ कि.मी अंतरावर असलेल्या शेंदुर्णी ता,जामनेर येथील एका खासगी डॉक्टरचा कोविड-१९ चा अहवाल सकारात्मक आल्याने सोयगाव शहराला हादरे बसले आहे.सोयगावचा जवळपास सर्वच संपर्क शेंदुर्णीला आहे.कोविड-१९ चा सकारात्मक आलेल्या या खासगी डॉक्टरकडे जंगलातांडा येथील चार जणांनी उपचार घेतले असल्याने या चार जणांचा या डॉक्टरसोबत संपर आल्याची माहिती मिळताच आरोग्य पथकाने जंगलातांड्याला जावून या चारही जणांची कोविड-१९ तपासणी करून त्यांना १४ दिवस होमकोरोटाईन राहण्याचा सल्ला दिला असून पाचोरा जि,जळगाव येथील त्या सकारात्मक अहवाल प्राप्त डॉक्टरसोबत निमखेडी ता.सोयगाव येथील २८ वर्षीय तरुणीचा संपर्क आल्याने या महिलेला होमकोरोटाईन करण्यात आले आहे,मात्र दुसऱ्यांदा कोविड-१९ च्या तडाख्यातून वाचलेल्या सोयगाव तालुक्याला मात्र आता धोका निर्माण झाल्याचे चिन्हे आढळत असून सोयगावात कोविड-१९ चा शिरकाव होवू नये यासाठी मात्र तालुका आरोग्य विभागाने मोठी पावले उचलली आहे.त्याच्या खांद्याला खांदा लावून सोयगाव पंचायत संमिती आणि तहसील कार्यालयाचा महसूल विभागही दिमतीला आहे.त्यामुळे सोयगाव तालुक्यात कोविड-१९ चा प्रवेश होणारच नसल्याचे संकेत प्रशासनाकडून मिळत आहे.
शेंदुर्णीच्या त्या खासगी डॉक्टरशी वैद्यकीय उपचारासाठी सोयगाव तालुक्यातील काही रुग्ण संपर्कात असल्याची माहिती मिळताच आरोग्य विभागाने त्यांची तपासणी करून त्यांना १४ दिवस होमकोरोटाईन केले आहे.त्यांच्यात कोणतेही लक्षणे आढळलेली नाही.त्यामुळे चिंतेचे करण नाही.
―डॉ.श्रीनिवास सोनवणे
तालुका वैद्यकीय अधिकारी