मुंबई:आठवडा विशेष टीम― देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जान ताब्यात घ्यावे, अशी सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. चव्हाण यांच्या या सूचनेला शिर्डीच्या साई बाबा संस्थानने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शिर्डी हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे देवस्थान मानले जाते. संस्थानकडे सध्या सुमारे साडेचारशे किलो सोने आहे. भक्तांनी ते विविध प्रकारे दान म्हणून दिलेले आहे. संस्थानचे वार्षिक उत्पन्न ७०० कोटी असून विविध प्रकारचा वार्षिक खर्च ६०० कोटी रुपये इतका आहे. लॉकडाउनमुळे संस्थानच्या उत्पन्नात लक्षणीय स्वरुपात घट झाली आहे. मात्र, एफडी मोडून कर्मचाऱ्यांचा पगार केला आहे. शिर्डी संस्थानचे अध्यक्ष डॉ. हावरे यांनी संकटकाळात हे सोने देशाच्या उपयोगी येत असेल तर आम्हाला व साई भक्तांनाही आनंदच असल्याचे म्हटले आहे.