बीड: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुऱ्हाळाला आर्थिक मंदिचे ग्रहण , ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये म्हणून गुऱ्हाळ चालवतोय – प्रभाकर जाधव

बीड:आठवडा विशेष टीम― ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर शेतामधे ऊभा आहे, साखर कारखाने बंद झाले आहेत, या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून यावर्षी आर्थिक मंदि असताना सुद्धा गु-हाळ चालु ठेवल्याचे बीड तालुक्यातील मौजे लोणीघाट येथिल गु-हाळ मालक प्रभाकर जाधव यांनी सांगितले.

प्रभाकर कल्याण जाधव , गुऱ्हाळ मालक-चालक

डीझेल भेटत नाही , मजुरांचा प्रश्न गंभीर बनला आहे, पपडी ,आयरानी पावडर भेटत नाही, घोटाळा झाला तर सामान भेटत नाही, लातुरला जावं लागतं,गु-हाळ आठ-आठ दीवस बंद राहतं , तयार झालेला गुळ बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्यामुळे बाहेर जिल्ह्यात पाठवता येत नाही.बीडमध्येच इथल्याइथं विकावं लागतं.एका व्यापा-याला ३ लाख रुपये किंमतीचा माल दिला.परंतु कोरोना मुळे बाजारपेठा बंद असल्याचे कारण देत माल न विकल्याचे सांगत त्याचे पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे.यामुळे आर्थिक संकटात सापडलो आहे.

डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते बीड

कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर २५ एप्रिल पासुन लाकडाऊन मुळे ऊसतोडणी मजूरांनी ऊसतोडणी बंद केली , साखर कारखाने बंद पडले.ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस शेतातच ऊभा राहीला.त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.परंतु बीड तालुक्यातील मौजे लोणीघाट येथिल गु-हाळ मालक प्रभाकर जाधव यांनी आर्थिक मंदी असताना सुद्धा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून गु-हाळ चालु ठेवल्याचे सांगितले या लघु उद्योगांना शासनाने आर्थिक मदत करावी जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी पुढाकार घेतलेल्या या लघुउद्योग चालवणारे यांचा शासनाने सहानुभूती पुर्वक विचार करावा. एवढीच अपेक्षा आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.