औरंगाबाद: सोयगावात शहरवासीयांची प्राथमिक तपासणी ,नगर पंचायतीचा उपक्रम

सोयगाव,दि.१९:आठवडा विशेष टीम―
शहरात संक्रमणाची संख्या वाढू नये आणि शहराच्या बाजूला जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे सकारात्मक रुग्ण आढळल्याने सोयगाव नगर पंचायतीच्या वतीने शहरवासीयांची प्राथमिक तपासणी मोहीम मंगळवारी हाती घेतली आहे.
या प्राथमिक तपासणीत ऑक्सिजन आणि तापमान तपासणी करण्यात येत असल्याची माहिती समन्वयक योगेश पाटील यांनी सांगितली,या उपक्रमासाठी शहरातील खासगी डॉक्टरांचे पथक कामी लावण्यात आले असून आरोग्य सेविका आणि आशा कार्यकर्ती,अंगणवाडी सेविकांना या उपक्रमात समाविष्ट करून नगर पंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून हा उपक्रम शहरात हाती घेतला आहे.शहरवासीयांच्या प्राथमिक आरोग्य तपासणीत शहरातील निम्या पेक्षा अधिक कुटुंबाची तपासणी आकरण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष कैलास काळे यांनी दिली असून मुख्याधिकारी सचिन तामखंडे या उपक्रमावर लक्ष ठेवून होते.शहरातील सर्वच्या सर्व सतरा प्रभागात हा उपक्रम राबवियात आला आहे.नगराध्यक्ष कैलास काळे,मुख्याधिकारी सचिन तामखंडे,भगवान शिंदे,राजू जंजाळ,राजू मानकर,दिनेश हिवाळे ,आदींनी पुढाकार घेतला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post सोयगाव: विनापरवाना गावात प्रवेश करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा ,मुख्यकार्यकारी यांनीच काढले आदेश
Next post 'त्या' व्हायरल व्हीडिओ प्रकरणी चौकशी करण्याचे धनंजय मुंडे यांचे जिल्ह्याधिकाऱ्यांना आदेश