आर्थिकबीड जिल्हाराजकारण

मुख्यमंत्री साहेब मागील ३५ वर्षांच्या भ्रष्टाचाराचा जाब नगराध्यक्षांना विचारा- फारुख पटेल,अमर नाईकवाडे

बीड प्रतिनिधी: मुख्यमंत्री साहेब उद्घाटन करण्याआधी बीड शहराच्या विकासासाठी मागील पस्तीस वर्षाच्या काळात आलेला हजारो कोटी रुपयांचा निधी कुठे गडप झाला याचा जाब अगोदर नगराध्यक्षांना विचारा. यु आय डी एस एस एम टी ही ३४ कोटींची पाणीपुरवठा योजना २००८ साली बीड नगरपालिकेच्या वतीने राबवण्यात आली होती, तब्बल ५४ टक्के वाढीव दराने ही योजना नगरपालिकेच्या सभागृहात मंजूर करून पात्र नसलेल्या गुत्तेदार साठी तीन तीन कोटी चे तुकडे पाडून नियमाच्या विरुद्ध निविदा प्रक्रिया करून गुत्तेदाराच्या घशात घातली, २०१४ सालची २८ कोटींची हद्दवाढ योजना अशीच गुत्तेदाराच्या घशात घातली, व मार्च २०१७ मध्ये तब्बल साडेतेरा कोटींची बिले कामें न करताच उचलण्यात आली. बोगस कामाचे बींग फोडल्यामुळे सदरील योजनेची कामे आता होत आहेत.
नगरोत्थान अभियानांतर्गत २०१२ साली बीड नगर परिषदेसाठी महाराष्ट्र शासनाने तब्बल २९ कोटी ५८ लाखाचा निधी दिला होता. त्या कामांची वर्क ऑर्डर ७ मार्च २०१२ ला देण्यात आली होती. सदरील योजनेमध्ये सुभाष रोड व राजुरी वेस ते बलभीम चौक मार्गे माळीवेस (दोन्ही सिमेंट रोड) आदी कामे त्यात होती. सदरील योजनेचे पोस्टमार्टम संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सभापती असताना केल्यामुळे सुभाष रोडचे काम २०१८ साली करण्यात आले व राजुरी वेस ते बलभीम चौक मार्गे माळीवेस हा रस्ता सिमेंटचा करण्याएवजी डांबराचा करण्यात आला. सिमेंट रोडला मंजुरी असून देखील हा रोड डांबराचा का करण्यात आला? ही सगळी अनियमितता नगराध्यक्षांनी का केली याचा जाब राज्याचे प्रमुख म्हणून आपण बीडच्या नगराध्यक्षांना विचारा मगच उद्घाटन करा अशी मागणी पालिकेचे गटनेते फारुख पटेल व नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी केली आहे.

विचारांची लढाई आम्ही विचारानेच लढणार - पटेल, नाईकवाडे

बीड नगर परिषदेच्या विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी उद्या मा. मुख्यमंत्री बीड शहरात येत आहेत, त्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाच्या वतीने खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून पोलीस उपअधिक्षक श्री खिरडकर यांनी पालिकेतील विरोधक म्हणून आमच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निदर्शने वगैरे काही करण्यात येणार आहे का याविषयी युवा नेते संदीप क्षीरसागर, गटनेते फारुख पटेल नगरसेवक अमर नाईकवाडे त्यांच्याशी संवाद साधला व चर्चा केली, की विरोधक म्हणून आम्ही सत्ताधाऱ्यांशी विचारांची लढाई लढतोय तीही विचारानेच त्यामुळे बीड शहरासाठी निधी देणाऱ्यांना काळे झेंडे दाखवणे, निदर्शने करणे योग्य नाही. तसेच या वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये जनताच भ्रष्टाचार्‍यांना त्यांची जागा दाखवल्या शिवाय शांत बसणार नाही व याव्यतिरिक्त देखील नगरपरिषदेमध्ये मोठ मोठे घोटाळे करण्यात आलेले असून लवकरच त्याचाही पर्दाफाश करण्यात येईल असे पत्रकाच्या शेवटी गटनेते फारुख पटेल व अमर नाईकवाडे यांनी कळवले आहे.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.