औरंगाबाद: सोयगाव तालुक्यात ६८९८ जणांचा कोरोटाईन कार्यकाल संपला ,सोयगावचा धोका टळला ,आरोग्य विभागाची माहिती

सोयगाव,दि.१९:ज्ञानेश्वर डी. पाटील― सोयगाव तालुक्यात परजिल्ह्यातून आणि परराज्यातून आलेल्या ८९७५ जणांपैकी ६८९८ जणांचा होमकोरोटाईनचा कार्यकाळ संपल्याने सध्या आरोग्य विभागाच्या निरीक्षणाखाली १९६९ जण होमकोरोटाईन राहिले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे यांनी दिली आहे.त्यामुळे सोयगाव तालुक्यात अद्यापपर्यंत एकही संशयित रुग्ण आढळलेला नसल्याने सोयगावचा कोविड-१९ चा धोका पूर्णपणे टळला असल्याची स्पष्टोक्ती आरोग्य विभागाने दिली आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोविड-१९ चा प्रवेश होण्याची शक्यता निर्माण झाली असतांना सोयगाव तालुका प्रशासन मात्र २४ तास सतर्क राहिल्याने सोयगाव धोक्यापासून दूर राहिलेला आहे.त्यामुळे सोयगाव तालुक्यात कोविड-१९ ची शक्यता नसल्याची पुष्टी आरोग्य विभागाने दिली आहे.पर जिल्ह्यातून आणि पर राज्यातून परतलेल्या ८९७५ जणांची तातडीने कोविड-१९ ची तपासणी करण्यात आल्यावर त्यांचा होमकोरोटाईनचा कार्यकाळ संपलेला आहे.त्यामुळे आता होमकोरोटाईनमध्ये सोयगाव तालुक्यात १९६९ इतकेच बोटावर मोजण्याइतके रुग्ण शिल्लक असल्याने येत्या चार ते पाच दिवसात या पैकी पाचशेच्या वर रुग्णांचा कार्यकाळ संपणारा आहे.दरम्यान महसूल.आरोग्य,आणि पंचायत समितीच्या त्रिसूत्री अंमल पद्धतीने तहसीलदार प्रवीण पांडे यांनी मांडलेल्या नियोजनबद्ध आराखड्यातून सोयगाव तूर्तास कोविड-१९ च्या धोक्यापासून बाहेर आहे.आरोग्य विभागाची व्यूहरचना आणि पंचायत समितीच्या विभागांची मिळालेली साथ यावरच सोयगावच्या कोविड-१९ ची मदार अवलंबून होती ग्राम पंचायतींनी तातडीने फवारण्य घेवून गावांची केलेली निर्जंतुकीकरण आणि गटविकास अधिकारी यांनी गावागावात भेटी देवून केलेल्या जनजागृतीचा मोठा फायदा ठरला आहे.लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी बजावलेली भूमिकाही सोयगावसाठी महत्वाची ठरली असल्याने सोयगाव लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातही सुरक्षित राहिला आहे.तालुका आरोग्य अधिकारी डॉ,श्रीनिवास सोनवणे यांनी एकाकी दिलेली झुंज यामध्ये सोयगावसाठी मोलाचा वाटा ठरला आहे.

आरोग्य विभागाचे कौटुंबिक सर्वेक्षण मोहीम-

तालुका आरोग्य विभागाने गावागावात २२२०६ कुटुंबांपैकी तब्बल २१६३७ हजार कुटुंबाचे कोविड-१९ चे सर्वेक्षण आणि तपासण्या केल्या आहे.तालुका आरोग्य अधिकारी डॉ श्रीनिवास सोनवणे यांनी केलेल्या कोविड-१९ तपासण्या आणि आरोग्य कर्मचार्यांना व गावातील आशा सेविकांना देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन झाल्याने लॉकडाऊनच्या चौथ्या भागातही सोयगाव सुरक्षितच आहे.

तहसीलदार प्रवीण पांडे आणि गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे यांनी आंतरजिल्हा नाक्यांना भेटी देवून त्यावर नियंत्रण ठेवून जिल्ह्याबाहेरील व्यक्तींचे नाक्यांवरच थर्मल तपासणी अक्र्ण्याच्या उपाय योजनांनी सोयगाव तालुका प्रशासन तूर्तास यशस्वी ठरले आहे.त्यामुळे सोयगावचा एकही स्वॅब नमुना तपासानिविना प्रलंबित राहिलेला नाही.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.