कोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाबीड तालुकाब्रेकिंग न्युजलिंबागणेश सर्कलशेतीविषयक

कोरोनाने कांदाचाळीचं महत्व समजावलं , कांदा चाळ नसणारांचा कांदा अवकाळी पावसामुळे शेतातच नासला , शासनाने आर्थिक मदत करावी―डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश:आठवडा विशेष टीम―एरवी शासनाने शेतक-यांना दीलेल्या कांदाचाळी अपवाद वगळता शोभेच्या वस्तू अथवा अडगळीची खोली म्हणून वापरात यायच्या.परंतु कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्याने शेतक-यांना गाडीभाडेच परवडत नसल्याने त्यांनी कांदा कांदाचाळीत ठेवण्यास प्राधान्य दिले असुन भविष्यात भाव चांगला मिळेल तेव्हा विक्रि करायचा मानस बोलावून दाखवला.परंतु कांदाचाळ नसलेल्या शेतक-यांचा कांदा अवकाळी पावसाने शेतातच नासल्याची उदाहरणे मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात.

बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथिल शेतकरी दादाराव येडे आणि इंदुबाई येडे या दांम्पत्याची व्यथा

दादाराव येडे , कांदा उत्पादक शेतकरी मो.नं. ९४०३०३७३२९

एक एकर कांदा लागवड केली होती, नांगरट ,खुरपण ते कांदा काटणी एकुण ५० हजार रुपये खर्च आला.परंतु कोरोना महामारी मुळे बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्यात. बाहेर गावी पाठवायला गाडीभाडे आणि दलालांकडून होणारी आर्थिक पिळवणूक त्यामुळे कांदा सध्या वाळवुन कांदा चाळीत ठेवलाय.दोन ते अडीच लाख रु.उत्पन्न निघलं असतं पण आता केलेला खर्च सुद्धा निघणं अवघड झालंय.

इंदुबाई दादाराव येडे , कांदा उत्पादक

सुरूवातीला नांगरट , रोपं खरेदी ,गांजी पद्धतीने लागवड ते मजूर लाऊन कांदा कापणे , चाळणे आदि. ५० हजार रुपये खर्च आला. सध्या १५ दिवसांपासून १५ महिला मजुर कामाला आहेत.प्रत्येकीला ३०० रु दिवसाला हजेरी ,या कोरोना महामारी मुळे कोणी कामाला येत नाही. आलेल्या मजुरांची मजुरी द्यायची सुद्धा पंचायत झालीय.

कैलास गायकवाड , मागणी करुन सुद्धा कांदाचाळ न मिळालेला शेतकरी

कांदा चाळ नसल्यामुळे अवकाळी पावसामुळे काटलेला कांदा भिजुन शेतातच नासु लागलाय, बाजारपेठा बंद ,आठवडे बाजार सुद्धा बंद,मग कसा विकायचा हेव कांदा आणि कसा खर्च निघायचा आणि शेतक-यांची नुकसान भरपाई कोण देणार ?? शासनाकडं मी कांदा चाळीसाठी रितसर मागणी केली होती,पण मला कांदाचाळ मंजूर झालीच नाही, गरीबाला कुणी वालीच राहीला नाही.आमच्या सारख्या शेतक-यांनी जगायचं तरी कसं??

डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते बीड

निदान लाकडाऊन संपल्यानंतर तरी कांदा उत्पादकांना शासनाने दिलासा द्यावा.मागेल त्याला कांदाचाळ मंजूर करून तात्काळ निधि वितरीत करण्यात यावा. म्हणजेच अवकाळी पावसामुळे शेतातच कांदा नासणार नाही आणि आर्थिक नुकसान होणार नाही.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.