पायऱ्या नसलेल्या विहीरीत क्रेनच्या पाटीत ऊभे राहून विहीरीत गाळकाढण्यासाठी उतरण्याचा मजुरांचा रोजचा जीवघेणा संघर्ष– डॉ गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम― पावसाळा सुरू होण्यासाठी केवळ १५ दिवस बाकि आहेत, त्यामुळे विहीरीतील गाळ क्रेनच्या सहाय्याने पाय-या नसलेल्या विहीरीत क्रेनच्या पाटीत ऊभे राहून उतरून काम करण्याचा रोजचा जीवघेणा संघर्ष सुरू आहे.

राजेंद्र ढास , क्रेन चालक-मालक

क्रेनचे भाडे दिवसाला हजार रुपये रोज असुन पुरुषाला दिवसाला ४०० रु.तर महीलेला ३०० रु. मजुरी द्यावी लागते. दिवसभरामध्ये २०० क्रेनच्या पाट्या गाळ काढला जातो. बराचसा पैसा डिझेल महागले आहे व नियमित मिळण्यास अडचण येते.पावसाळ्यापुर्व आमचा सिझन जोरात असतो.

गवळण बाई आणि मजुर

आमचं हे रोजचंच झालंय, सुरूवातीला भिती वाटायची, परंतु ३-४ वर्षांपासून काम करत आहोत त्यामुळे आता नजर मेली आहे. कधीकधी अपघात होऊन वरून दगड पडुन अथवा क्रेनची पाटी डोक्यात पडुन मजुरांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.सध्या लाकडाऊनच्या काळात पोटासाठी काम मिळणं अवघड झालं

डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते लिंबागणेश(बीड)

अशा असंघटीत कामगारांना अपघाताने गंभीर दुखापत अथवा मृत्यू झाल्यास अपघात विमा मिळत नाही, त्यांची नोंदणी नसते.
बहूतांश मनरेगा अंतर्गत जलसिंचन विहीरी या ग्रांमपंचायतचे सरपंच त्यांच्या धनदांडग्यां कार्यकर्ते यांना देतात.अर्थातच विहिर मंजुरीसाठी ठरलेला आवश्यक मेहनताना घेतातच. नंतर पंचायत समिती अधिकारी,कर्मचारी यांचा खिसा गरम करावाच लागतो त्याशिवाय फाईल पुढे सरकतच नाही. काही ठिकाणी तर जुनी विहीरच नविन खोदली असल्याचे दाखवून संगनमताने निधिचा अपहार केला जातो. गरजु,कष्टकरी शेतकरी यांना वैयक्तिक जलसिंचन विहीरीचा लाभ मिळायला हवा आणि योजना पारदर्शकपणे राबवायला हवी.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.