#CoronaVirus: बीड जिल्ह्यात उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२

बीड,दि.२०:जिल्हा माहिती कार्यालय― बीड जिल्ह्यात गेवराई, माजलगाव,आष्टी पाठोपाठ बीड आणि केज तालुक्यातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १९ इतकी असून जिल्ह्यातून स्थलांतरित झालेले ६ व उपचारा दरम्यान मृत झालेली १ रुग्ण वगळता सध्या उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या एकूण १२ झाली आहे.

  • गेवराई-२
  • माजलगाव-३
  • आष्टी-७ ( १मृत, ६ स्थलांतरित )
  • बीड -५
  • केज-२

जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णापैकी आष्टी तालुक्यातील एका वृद्धेचा मृत्यू झाला व सहा जणांना पुण्याला हलविण्यात आले आहे.
उर्वरित रुग्णांवर जिल्हयात उपचार सुरु असून उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या एकूण १२ झाली आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.