औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

औरंगाबाद: सोयगाव तालुक्यात कंटेमेंट झोन आणि पोझीटिव्ह रुग्ण हा शब्द प्रयोग वगळला ,कोविड-१९ ची बाधाच नाही आरोग्य विभागाची माहिती

सोयगाव,दि.२०:ज्ञानेश्वर डी.पाटील―
राज्यासह जिल्ह्यात तब्बल मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोविड-१९ ने धुमाकूळ घातला असतांना मे महिन्यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वाढता झालेला आहे.मात्र कोविड-१९ च्या शासनाच्या लढ्याच्या ४५ व्या दिवशीही सोयगाव तालुक्यात कोरोना संसर्गाची कोणतीही बाधा झाल्याचा प्रकार आढळून आला नसल्याने कोविड-१९ च्या संदर्भातील घाबरगुंडी आणि थरकाप उडविणारे कंटेमेंट झोन आणि पोझीटिव्ह रुग्ण हे शब्द प्रयोग सोयगाव तालुकातून वगळणी झालेली आहे.
कोविड-१९ च्या ४५ व्या दिवशीही तालुका प्रशासन सज्ज असल्याने सोयगाव तालुक्यात अद्याप पर्यंत एकही संशयित रुग्ण आढळून आलेला नसल्याची पावतीच आरोग्य,तहसील आणि पंचायत समितीच्या विभागांनी मिळविली आहे.मार्च महिन्यापासून तालुक्यात ९९२७ नागरिक परजिल्ह्यातून आणि परराज्यातून आलेली आहे.आरोग्य विभागाने या सर्वांना शिस्तबद्ध पद्धतीने होमकोरोटाईन करून त्यांचा कालावधीही संपवूला आहे.७३१९ नागरिक होमकोरोटाईन मधून बाहेर पडले असतांनाही तालुक्यात संसर्गाने डोकेवर काढलेले नाही.महसूल विभागाची कार्यपद्धती आणि आरोग्य विभागाची तपासणी मोहीम कामी पडलेली असतांना पंचायत समितीच्या सर्वच विभागांनी आणि ग्रामीण भागात ग्रामपंचायतींनी या लढ्यात केलेली कामगिरी कामी आली आहे.तहसीलदार प्रवीण पांडे यांनी कोविड-१९ च्या संदर्भात अद्याप पावेतो स्थानिक अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या तब्बल २० च्या वर घेतलेल्या बैठका आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे यांनी राबविलेली कार्यपद्धती,गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे यांनी वेळोवेळी दिलेल्या ग्रामीण भागाच्या भेटी यामुळे सोयगाव तालुका कोविड-१९ मधून बाहेर आहे.त्यामुळे सोयगाव तालुक्यातून जिल्हाबाहेर उच्चारण्यात येणारे कंटेमेंट झोन आणि पोझीटिव्ह रुग्ण हे शब्द प्रयोग मात्र कायमचे वगळण्यात आले आहे.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.