बीड शहरातील मोमीनपुरा-अशोकनगर आणि जयभवानी नगर, सावतामाळी चौक परिसर कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित

या परिसरात संपूर्ण संचारबंदी लागू-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड, दि. २०:आठवडा विशेष टीम― बीड शहरातील मोमीनपुरा- अशोकनगर येथे २ रुग्ण आणि जयभवानी नगर, सावतामाळी चौक येथे ३ कोरोना विषाणूचे लागण (COVID १९ Positive) झालेले रुग्ण आढळुन आले असा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले असल्याने शहरातील इतर ठिकाणी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन फौजदारी प्रकिया दंड सहिता १९७३ चे कलम १४४ नुसार मोमीनपुरा अशोकनगर परिसरातील गफुर ईब्राहिम मिस्त्री यांच्या घरापासून ते बिलालमाई बर्तनवाले यांच्या घरापर्यतचा व जयभवानीनगर, सावतामाळी चौक परिसरातील बाबुराव मारोतीराव दुधाळ यांच्या घरापासून ते कुंडलीक खाडे यांच्या घरापर्यंतचा परिसर कन्टेनमेंट झोन (Containment zone) म्हणून घोषित करण्यात आला आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. तसेच हा सर्व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३१ में २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक ३१ में २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अंमलात राहतील.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post अहमदनगर: जिल्ह्यात आढळले आणखी दोन कोरोना बाधीत ; नगर शहरातील रिक्षाचालक तर संगमनेर येथील बाधीत रुग्णाच्या पत्नीला कोरोनाची लागण
Next post बीड: पाटोदा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव ,वडवणीतही पॉझिटीव्ह ,जिल्ह्यात आज ४ अहवाल पॉझिटिव्ह