बीड जिल्हामहाराष्ट्र राज्य

बीड येथील माता व बाल रूग्णालयाच्या इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमीपूजन

बीड दि. ०६:- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत येथील जिल्हा रुग्णालयातील १०० खाटांच्या माता व बालसंगोपन केंद्राच्या (MCH-WING) इमारतीचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे झाले.
यावेळी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे , आमदार सर्वश्री जयदत्त क्षीरसागर, सुरेश धस, आर. टी. देशमुख, विक्रम काळे, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती संतोष हांगे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे,पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, लातूर येथील आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. एकनाथ माले,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी आर.बी. पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतिश हरदास, डॉ. राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच आरोग्य उपसंचालक, लातूर डॉ. एकनाथ माले यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते भूमीपूजन आणि माता व बालसंगोपन केंद्राच्या इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
या माता व बालसंगोपन केंद्राच्या इमारतीकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी ,राष्ट्रीय आरोग्य अभियान यांनी २१ कोटी ५ लक्ष रूपये इतक्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. तर १४ कोटी १५ लक्ष रूपयांच्या तांत्रिक मान्यतेसह निधी मंजूरही करण्यात आला आहे. या इमारतीचे एकूण बांधकाम क्षेत्र ६ हजार ८६४ चौ.मी. इतके असणार आहे. याशिवाय या माता व बालसंगोपन केंद्राकरिता अतिरिक्त २०० खाटा मंजूर करण्यात आल्या आहेत. त्याकरिता ६ हजार ९९३ चौ.मी. जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.