पोखरी गावातील महिलांची जीव धोक्यात घालून पाण्यासाठी पायपीट, १५ दिवसांपासून गावातील पाणीपुरवठा बंद, ग्रामसेवक, सरपंच, तलाठी, उडवाउडवीची उत्तरे देतात― डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश:आठवडा विशेष टीम― बीड तालुक्यातील मौजे पोखरी येथिल गावांमध्ये तिव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे, १५ दिवसांपासून गावातील ग्रामिण पाणीपुरवठा योजना बंद आहे ,खाजगी बोअरवेल मालक बिभिषण मुळीक यांचाच आधार, १ किलोमीटर महिलांना पाण्यासाठी पायपीट ,जिल्हा प्रशासनाने तात्काळ टँकर सुरू करावेत अशी ग्रांमस्थांची मागणी आहे.

सुमनबाई मुळिक ,ग्रामस्त

इळभर बसावं लागतं,पाणी नाही,असंच पाणी न्यावं लागतं, प्यायाला पाणी न्यावं लागतं, उतराया येत नाही,येंगाया येत नाही,म्हता-या माणसांनी कुठं जायाचं

छाया मुळीक – विद्यार्थिनी ,

कोमलबाई , मालनबाई , रखमाबाई ( महिला ग्रांमस्थ )

मी दहावीत शिकत असुन पाण्याची अडचण आहे, पाणीच भेटत नाही,
गावात नळाला दहा -दहा दिवस पाणी येत नाही, मग या विहीरीवरूनच दिवसभर पाणी न्यावे लागते

बाबासाहेब मुळीक , ग्रामस्थ मो.नं.९३७०८३२१२३

पाण्याची अडचण आहे, बिभिषण मुळीक यांच्या खाजगी विहीरीवरून पाणी न्यावं लागतं, यांनी पाणी नाही दिलं तर गाव बिनपाण्यावाचुन मेलंच बघा.

बिभीषण मुळीक ,खाजगी बोअरवेल मालक मो.नं.९५५२१०१०२२

५-६ वर्षांपासून मी बारामाही गावातील लोकांना पाण्यासाठी अडवणुक करत नाही, शेवटी पाणी देणं हे पुण्याचं काम आहे. जेव्हा लाईट असते तेव्हा मोटर चालू करुन गावकरी पाणी विहीरी वरुन नेतात. ग्रामसेवकाला ६०० रु नळपट्टी दिली आहे.तरी ग्रामसेवक म्हणतात पुढील वर्षाची नळपट्टी आत्ताच भरा.या कोरोनाच्या काळात पुढील वर्षाची नळपट्टी कशी भरायची.

चतुर्भुज फाळके , ग्रामस्थ मो.नं. ९३७०२२१६७०

गावातील पाणी पुरवठा १५ दिवसांपासून बंद आहे, पाण्याची फार अडचण आहे, ग्रामसेवकाला फोन केला होता. ग्रामसेवकाने लाईट नाही ,तार नाही अशी उडवाउडवीची उत्तरे दिली,गोरगरीबांचे पाण्यावाचून फार हाल होत आहेत.

डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते बीड

जिल्हाधिकारी साहेबांनी ऊन्हाळ्यात ग्रांमस्थांचे पाण्यावाचून हाल होऊ नयेत म्हणून हेल्पलाईन नंबर जाहिर प्रसारमाध्यमांत दिले आहेत.त्याद्वारे पाणीटंचाई कळवावे असे सांगितले आहे परंतु ज्यांनी गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी लक्ष देणं गरजेचं आहे ते सरपंच , ग्रामसेवक , तलाठी ग्रांमस्थांनी तक्रारी केल्या नंतर सुद्धा निगरगटृपणे दुर्लक्ष करतात त्यांच्यावर जिल्हाधिकारी यांनी कारवाई करायला हवी यासाठी जिल्हाधिकारी बीड यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे पाठवले आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.