सूट मिळताच वर्दळ वाढली ,सोयगाव तालुक्यातील वाढत्या वर्दळीमुळे प्रशासनाची चिंता

सोयगाव,दि.२१:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
लॉकडाऊन-४ मधून खरिपाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना सूट मिळताच पुन्हा वर्दळीने सोयगाव तालुका हावूसफुल झाला असून गुरुवारी चक्क कोविड-१९ ला बाय-बाय केल्याचे चित्र दिसत होते,त्यामुळे मात्र वाढत्या वर्दळीची तालुका प्रशासनाला वाढती चिंता लागून आहे.
जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्या आदेशान्वये खरिपाच्या हंगामासाठी पूर्वतयारीला सूट देण्यात आली आहे.कृषी विषयक कामे आणि शेतीच्या हंगामाच्या पूर्वतयारीची हालचाल सोयगाव तालुक्यात सुरु झाली आहे.परंतु शेतीच्या नावाखाली रिकामटेकड्यानीही घराबाहेर निघण्याची तसदी घेतली असून त्यामुळे मात्र तब्बल ६० दिवसानंतर ग्रामीण भागही वर्दळीचा आढळून आला आहे.त्यामुळे तातडीने सोयगाव पोलिसांनी दुपारनंतर गस्त हाती घेतली होती.शेती कामांमध्ये मिळालेल्या सूटचा फायदा मात्र ग्रामीण भागातील विनाकारण फिरणाऱ्यानी सुद्धा घेवून गुरुवारी तालुकाभर गर्दीची वर्दळ वाढविली होती.आधीच सोयगाव तालुक्याच्या चारही दिशांनी कोविड-१९ चा विषाणू येवून थबकला असून तालुका प्रशासनाच्या यंत्रणांनी हा विषाणूला सोयगाव तालुक्याच्या प्रवेशद्वारावरच थोपविले असतांना हा विषाणू कधीच सोयगाव तालुक्यात शिरकाव करेल याचा थांगपत्ताही लागणार नसल्याने तालुका प्रशासनाची चिंता वाढली आहे.त्यातच विनाकारण फिरणार्यांनी वर्दळ वाढविल्याने आणखीनच चिंतेत भर पडली आहे.
ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच आस्थापना अचानकपणे सुरु झाल्याच्या पहावयास मिळाल्या होत्या संबंधित स्तानिक प्रशासनाने मात्र या आस्थापनांवर कोणतेही निर्बंध घातले नसल्याने ग्रामीण भाग मुक्तपणे संचार सुरु झाल्याचे पहिल्याच दिवशी पहावयास मिळाले.