बीड जिल्हामहाराष्ट्र राज्यसामाजिक

बीड जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वस्तीग्रह नाही - निलेश चाळक

सरकारकडून मराठा विद्यार्थ्यांची फसवणूक ;निलेश चाळक यांनी माहीती अधिकारातून केला भांडाफोड

बीड दि.०६:-राज्य सरकारने २०१७/१८ मध्ये जाहीर केले होते कि,महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यासाठी वस्तीग्रह बाधण्यात येईल परंतु वर्षभरानंतर ही बीड जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह मंजूर करण्यात आले नाही त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे आणि पुन्हा एकदा मराठा विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे बोलले जात आहे सामाजिक कार्यकर्ते निलेश चाळक यांनी सरकारच्या या घोषणेचा भांडाफोड केला आहे.
याबाबत अधिक माहीती अशी कि,महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत होती यासह ईतर मागण्यासाठी २०१६/१७ मध्ये महाराष्ट्रात मराठा समाजाच्या वतीने लाखोंनी मोर्चे काढले सदर मोर्चाची दखल घेवून मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट २०१७ मध्ये घोषना केली होती कि आम्ही मराठा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह बांधणार त्याच्या बांधकामासाठी ५ कोटी रुपये देण्यात येतील. पंरतू मा,मुख्यमंञ्याची ही घोषना आज घोषणाच आहे याबाबत त्यांनी कोणतीही ठोस भुमिका मुख्यमंञी देंवेद्र फडणवीस यांनी घेतली नाही सदर परिस्थितीचा एक वर्षानतंर समाजिक कार्यकर्ते निलेश चाळक यांनी भांडाफोड केला आहे याबाबत निलेश चाळक यांनी जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्या माहीती अधिकार अर्जातून बीड जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वस्तीग्रह मंजूर करण्यात आले आहे का ? मराठा विद्यार्थ्याच्या वस्तीग्रहासाठी एकून किती निधी मंजूर करण्यात आला आहे व त्यांच्या बांधकामाला कधी सुरूवात होईल ही माहीती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागवली होती याबाबत जिल्हाधिकारी बीड यांनी सहायक आयुक्त समाजकल्याण अधिकारी बीड यांना पञ काढून समाजिक कार्यकर्ते निलेश चाळक यांना मुदतीत माहीती पुरविण्याचे आदेश दिले होते दि २३ जानेवारी २०१९ रोजीच्या पञाने सहाय्यक समाजकल्याण आयुक्त समाजकल्याण अधिकारी बीड यांनी समाजिक कार्यकर्ते निलेश चाळक यांना कळवले कि,महाराष्ट्र शासनाकडून मराठा विद्यार्थ्यासाठी बीड जिल्ह्यात एक ही वस्तीग्रह मंजूर करण्यात आलेले नसून वस्तीग्रह बांधकामाबाबत कोणतीही माहीती या कार्यालयात उपलब्ध नसलेचे कळविले त्यामुऴे येणार्या निवडणूकीत मराठा समाज सरकार जागा दाखवल्या शिवाय शांत बसणार नाही असे समाजिक कार्यकर्ते निलेश चाळक यांनी सागितले.


बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.