बीड: महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नविन पीककर्ज द्यावे–जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड दि २३:आठवडा विशेष टीम―महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना-२०१९ या योजने अंतर्गत पात्र असणाऱ्या व पोर्टलवरील यादीत नांव असणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप-२०२० हंगामामध्ये नविन पीक कर्ज उपलब्ध करुन देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यातील सर्व बँकांना केले आहे.

खरीप २०२०हंगामामध्ये योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना नविन पीक कर्ज मिळावे यासाठीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असुन,त्यानुसार सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका,व्यापारी व ग्रामीण बँका यांनी कार्यवाही करणे बाबत मा.जिल्हाधिकारी यांचे सर्व बैंकांना निर्देश दिलेले आहे असे शिवाजी बड़े, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,बीड यांनी कळविले आहे.

शासनाच्या सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत दि.२२ मे, २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना-२०१९ या कर्जमुक्ती योजने अंतर्गत शासनाकडुन प्रसिध्द केलेल्या यादीमधील ज्या
शेतकन्यांच्या कर्ज खात्यामध्ये कर्ज माफीच्या लाभाची रक्कम अद्याप जमा झालेली नाही.अशा खात्याबाबत सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंका,व्यापारी व ग्रामीण बैंका यांना खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.

१) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील खाती
सदर योजने अंतर्गत पोर्टलवर प्रसिध्द केलेल्या यादीमधील ज्या लाभार्थ्यांना या योजने अंतर्गत लाभ देण्यात आलेला नाही. अशा लाभार्थ्यांना थकबाकीदार न मानता खरीप-२०२० साठी पीक कर्ज द्यावे.तसेच सदर धकबाकीदार शेतकन्यांच्या कर्ज खात्यावर योजने अंतर्गत निर्गमित केलेल्या यादीमधील थकबाकीची रक्कम शासनाकडुन येणे दर्शवावी.संबंधित विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी अशा शेतकन्यांच्या कर्ज खात्यावर असलेली रक्कम शासनाकडुन येणे दर्शवावी. व अशा शेतकन्यांना खरीप २०२० साठी पीक कर्ज द्यावे.

तसेच सदर योजनेमध्ये प्रसिध्द केलेल्या पोर्टलवरील यादीमधील ज्या शेतकन्याच्या कर्ज खात्यावर कर्जमुक्तीची रक्कम जमा झालेली नाही.अशा शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने खरीप-२०२० साठी पीक उपलब्ध करुन दिल्यास अशा खातेदारांच्या कर्जमुक्ती योजने अंतर्गत शासनाकडुन देय असलेल्या रक्कमेवर शासन बैंकस व्याज देईल.

२) व्यापारी बैंका व ग्रामीण बैंकेतील खाती.
सदर योजने अंतर्गत शासनाकडुन पोर्टलवर प्रसिध्द केलेल्या यादीमधील लाभार्थ्यांच्या कर्ज माफीची रक्कम व्यापारी बैंक व ग्रामीण बैंका यांनी शासनाकडुन येणे दर्शवावी. तसेच व्यापारी व ग्रामीण बैंकामध्ये शेतकन्यांच्या एन.पी.ए.कर्ज खात्यावर शासनाकडुन अशा कर्ज खात्यावर देय असलेली रक्कम शासनाकडुन येणे दर्शवावी.तसेच व्यापारी बँका व ग्रामीण बँकांनी तात्काळ लाभार्थी शेतकन्यांना खरीप-२०२० साठी नविन पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे.

या बँकांना लाभार्थ्याच्या कर्ज खात्यावर
शासनाकडुन येणे रक्कमेवर दि.१ एप्रिल २०२० पासुन सदर रक्कमी प्राप्त होण्याच्या दिनांकापर्यत बँकांनी व्याज आकारणी करावी. शासनाकडुन व्यापारी व ग्रामीण बैंकेस असा निधी व्याजासह देण्यात येईल.तसेच योजनेत प्रसिध्द केलेल्या यादीतील ज्या शेतकन्यांच्या कर्ज खात्यावर कर्जमुक्तीची रक्कम जमा झाली नाही.अशा शेतकन्यांना या बँकांनी खरीप-२०२०साठी पीक
कर्ज उपलब्ध करुन दिल्यास अशा खातेदारांच्या कर्ज मुक्ती योजने अंतर्गत शासनाकडुन देय असलेल्या रक्कमेवर शासन संबंधित व्यापारी बैंक व ग्रामीण बैंक यांना व्याज देईल.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.