बीड: मसेवाडी ग्रामपंचायतला माहिती नसताना निधी उचलला ,लघुसिंचन तलाव शिर्ष दुरुस्तीचे काम झालेच नाही

मोक्का, संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी ― डॉ.गणेश ढवळे

बीड दि.२३:आठवडा विशेष टीम― बीड तालुक्यातील मौजे मसेवाडी येथिल लघुसिंचन तलाव शिर्ष भागातील दुरूस्तीचे काम न करताच २ लाख ६७ हजार ३०० रु.निधी उचलण्यात आला.यासंबधी गावचे सरपंच गवळण भारती , ग्रां.पं.स. जगन्नाथ मोरे, कैलास मांडले तसेच ग्रामसेवक सावंत , तलावाचे सुपरवायझर जोगदंड यांनी २०१९ मधे कुठलीही तलाव दुरुस्ती झाली नसल्याचे डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्याशी बोलताना सांगितले.

गवळण भारती , सरपंच - मसेवाडी–

मसेवाडी लघुसिंचन तलाव दुरुस्ती काम २०१९ मध्ये झाल्याचे मला तरी माहिती नाही.

कैलास मांडवे ,ग्रां.पं.स. मसेवाडी–

२०१९ मधे मसेवाडी लघुसिंचन तलाव शिर्ष भागातील दुरूस्तीचे कोणतेही काम झालेले नाही.

जगन्नाथ मोरे , ग्रां.पं.स.मसेवाडी–

२०१९ मधे पाटबंधारे विभाग मार्फत कोणतेही मसेवाडी लघुसिंचन तलाव शिर्ष भागातील दुरूस्तीचे काम झालेले नाही.

जोगदंड ,मसेवाडी लघुसिंचन तलाव सुपरवायझर–

२०१९ मधे कोणतेही मसेवाडी लघुसिंचन तलाव शिर्ष भागातील दुरूस्तीचे कोणतेही काम झालेले नाही.मी कुठेही साक्ष द्यायला तयार आहे.

डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते लिंबागणेश ,बीड–

कुठल्याही गावातील सरपंच, ग्रामसेवक , यांना अंधारात ठेवून पाटबंधारे विभाग क्र.३ चे कार्यकारी अभियंता करपे यांच्या आशिर्वादाने काळे नामक, चेअरमन साष्टांग मजुर सहकारी संस्था मर्यादित वासनवाडी या.बीड यांच्याशी संगनमताने आर्थिक लाभ घेत हा अपहार केला असुन संबंधित शासकीय अधिकारी व ठेकेदार यांच्यावर मोक्का अंतर्गत संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि अपहारीत रक्कम शासकीय तिजोरीत जमा करून संबंधित संस्था काळ्या यादित टाकण्यात यावी अशी लेखी तक्रार ई-मेलद्वारे मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री , कृषिमंत्री , सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड व विभागीय आयुक्त यांना पाठवली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post आष्टी: धनगरवाडी (पिंपळा) येथे कोरोनाचेे रुग्ण आढळल्याने कन्टेनमेंट झोन घोषित पूर्णवेळ संचारबंदी लागू
Next post फेसबुक मेसेंजर हॅक झाल्यानंतरही डॉक्टर अशोक लोढा यांच्या सतर्कतेमुळे अनेकांची फसवणूक टळली