फेसबुक मेसेंजर हॅक झाल्यानंतरही डॉक्टर अशोक लोढा यांच्या सतर्कतेमुळे अनेकांची फसवणूक टळली

परळी वैजनाथ दि.२३:आठवडा विशेष टीम― सध्या व्हाट्सअप , फेसबुक, एटीएम यासारख्या साधनांचा वापर करून ही खाती हॅक करुन लोकांची फसवणूक करण्याचे अनेक प्रकार पाहायला मिळत आहेत. अशाच एका प्रकाराला परळीच्या डॉक्टर अशोक लोढा यांनाही सामोरे जावे लागले, मात्र त्यांनी तातडीने दाखवलेल्या सतर्कतेमुळे त्यांच्या अनेक मित्र परिवाराचा फसवणूक होण्याचा धोका टळला आहे.

याबाबत अधिक सविस्तर माहिती अशी की परळी येथील सुप्रसिद्ध दंतचिकित्सक डॉक्टर अशोक लोढा यांचे फेसबुक वर इतरांसारखे खाते आहे . या फेसबूक ला जोडूनच येणारे मेसेंजर ही त्यांच्या मोबाईल मध्ये असले तरी वेळेअभावी ते कधीच फेसबुक मेसेंजर चा वापर फारसा करत नाहीत.

याचाच गैरफायदा घेत पुणे येथील समीर खन्ना नामक एका व्यक्तीने त्यांचे हे मेसेंजर खाते हॅक केले आणि त्यांच्या यांच्या मित्र यादीतील अनेक मित्रांना मला आता तातडीने दहा हजार रुपयांची आवश्यकता आहे ते पैसे गुगल पे ,फोन पेजने पाठविण्याची विनंती केली.

अचानक डॉक्टरांचा मेसेज आल्यामुळे त्यांना खरोखरच पैशाची आवश्यकता असेल असे समजून अनेकांनी या खन्ना नावाच्या नावाच्या व्यक्तीने दिलेल्या नंबरवर पैसे पाठवण्याची तयारी केली होती .

मात्र पद्मावती भागातील नगरसेवक विजय भोईटे , प्रशांत जोशी यांनाही अशा प्रकारचा मेसेज गेला असता त्यांना त्याबद्दल शंका आल्याने त्यांनी तातडीने डॉक्टर लोढा यांच्याशी संपर्क साधून हा प्रकार सांगितला त्यावर तातडीने डॉक्टर लोढा यांनी आपल्या मित्र यादीतील सर्व मित्रांना माझे अकाऊंट हॅक झाले असून आपल्याकडे कोणी पैशाची मागणी केल्यास ती देऊ नये असे कळल्याने एकाही व्यक्तीने त्या व्यक्तीला पैसे दिले नाहीत.

लोढा यांनी मोबाइल क्रमांकावरून त्या व्यक्तीचा संपूर्ण नाव गावाचे नाव ही माहिती काढून काल संभाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबत सायबर गुन्ह्याची तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री पवार हे करत आहेत.

दरम्यान नागरिकांनी आपल्या सोशल मीडियावरील खात्याची काळजी घ्यावी, वारंवार आपला पासवर्ड बदलत राहावा तसेच अशा प्रकारचे मेसेज आल्यानंतर त्यावर लगेच विश्वास न ठेवता खात्री करूनच पैशाचे व्यवहार करावेत असे आवाहन या घटनेत सजगता दाखवणाऱ्या डॉक्टर लोढा यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post बीड: मसेवाडी ग्रामपंचायतला माहिती नसताना निधी उचलला ,लघुसिंचन तलाव शिर्ष दुरुस्तीचे काम झालेच नाही
Next post औरंगाबाद:नानेगाव ते अंभइ रस्त्यावर सागवान जप्त ,सोयगाव वनपरिक्षेत्रात वन विभागाची कारवाई