औरंगाबाद:नानेगाव ते अंभइ रस्त्यावर सागवान जप्त ,सोयगाव वनपरिक्षेत्रात वन विभागाची कारवाई

सोयगाव दि.२३:आठवडा विशेष टीम―
सोयगाव वनपरिक्षेत्राच्या नानेगाव-अंभई रस्त्यावर एका वाहनात सागवानच्या चिरण मालाची वाहतूक करण्यात येर्त असल्याचे वनविभागाच्या पथकाच्या लक्षात येताच त्यांनी वाहनाला हटकले असता,त्यामध्ये सागाच्या १६ नग असलेल्या लाकडांचा माल सुमारे ०.५३६ घनमीटर मुद्देमाल आढळून आला वनविभागाच्या या छाप्यात अंदाजे ४४१७३ रु चा हा सागवान चा माल असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांनी सांगितले.
सोयगाव वनपरिक्षेत्राच्या नानेगाव-अंभई रस्त्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांचेसह वनकर्मचार्यांची गस्त सुरु असतांना अचानक या रस्त्यावरून टाटा माजिक वाहन क्रमांक-एम.एच-२० ई-जि-७६०९ हे दूरवरून अंतरावरून दिसले असता वनविभागाच्या पथकाने सापळा रचला,परंतु वाहनचालकाच्या लक्षात हा प्रकार येताच त्याने वाहनाला थांबवून त्यातून पळ काढला या वाहनात सागवानच्या १६ नगाच्या ०.५३६ घनमीटर सागवान आढळून आला असता तब्बल ४४१७३ रु चा मुद्देमाल या छाप्यात वनविभागाने जप्त केला असून सोयगाव वनपरिक्षेत्र कार्यालयात वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे,सहायक वनसंरक्षक डी.आर वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ,आर.एस साळवे,आर.जि गायकवाड,बाळू आप्पा ज्ञाने,अलीखा सिंघल,काशिनाथ कोहळे आदींनी हि कारवाई केली आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.