देयक न मिळाल्याने आली उपासमारीची वेळ ,सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर बापूसाहेब उदारे यांचे आमरण उपोषण

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
येथील बापूसाहेब उदारे यांनी एक वर्षांपुर्वी केलेल्या कामाचे देयक न मिळाल्याने उपासमारीची वेळ आल्याचे सांगून तसेच प्रशासनाला कळवत शनिवार,दिनांक 23 मे पासून कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग,अंबाजोगाई कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

आमरण उपोषणाबाबत बापुसाहेब उदारे यांनी निवेदनाद्वारे आपले म्हणणे प्रशासनाकडे मांडले आहे.निवेदनाच्या प्रतिलीपी त्यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे,पालकमंत्री धनंजयजी मुंडे,सचिव- सार्वजनिक बांधकाम विभाग,मंत्रालय,मुंबई.,विभागीय आयुक्त,कार्यालय,औरंगाबाद.,मुख्यअभियंता,सा.बां.विभाग,औरंगाबाद,अधिक्षक अभियंता,सा.बां. मंडळ,उस्मानाबाद.,जिल्हाधिकारी,कार्यालय बीड, अप्पर जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी,तहसीलदार,पोलीस निरीक्षक, पो.स्टे.अंबाजोगाई (शहर) आणि कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग,अंबाजोगाई यांना माहीतीस्तव दिले आहे.निवेदनात बापूसाहेब उदारे यांनी नमुद केले आहे की,स्वा.रा.ती.ग्रा.वै.महा व रूग्णालय,अंबाजोगाई परिसरातील परिचारिका वसतीगृहाच्या संडास व बाथरूम दुरूस्तीचे काम करून तब्बल 9 महिने होवून सुध्दा अद्यापपर्यंत मी केलेल्या कामाचे देयक मला मिळाले नसून कोरोनाच्या संकटामुळे माझी व माझ्या परिवाराची उपासमार होत असून मी,दि.23.05.2020 रोजी सा.बां.कार्यालयासमोर फिजीकल डिस्टन्सींग ठेवून आमरण उपोषण करीत आहे.याबाबत आमच्या प्रतिनिधीने उदारे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,अंबाजोगाई येथील स्वा.रा.ती.ग्रा.वै.महाविद्यालय व रूग्णालय परिसरात परिचारिका यांचे वसतीगृह आहे.त्या वसतीगृहातील वरच्या मजल्यावरील व खालच्या मजल्यावरील संडास व बाथरूम हे ब्लॉक झालेले होते.त्यामुळे तेथे गुडघ्या इतके पाणी साचून घाण व दुर्गंधी पसरत होती.या घाण पाण्यामुळे परिचारिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये म्हणुन तत्कालीन कार्यकारी अभियंता श्री.बंडे साहेबांनी सदरील काम तात्काळ करणेबाबत आदेशित केले होते.याबाबत त्यांनी रितसर कार्यारंभ आदेश क्र.1) जा.क्र./लेखा/निविदा/ब-1,दि 08/08/2019., 2) जा.क्र./लेखा/निविदा/ब-1,दि.09/08/2019 रोजी देवून पंधरा दिवसांच्या आत आपण केलेल्या कामाचे बील अदा केले जाईल असे ते म्हणाले होते.सदर कामाचे स्वरूप समजावून घेवून परिचारिका भगिनी या दिवसरात्र रूग्णांची आरोग्य सेवा करीत असल्यामुळे त्यांना तेथे घाणीत रहावे लागू नये तसेच त्यावेळी पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे त्या ठिकाणी दुर्गंधी पसरली होती व ते काम तात्काळ करणे अत्यंत आवश्यक होते.त्यामुळे मी मिञांकडून उसणवारीने पैसे घेवून आणि प्रसंगी पत्नीचे दागीने विकून सदर काम तात्काळ सुरू करून तेथील ब्रेकरच्या सहाय्याने सर्व काँक्रीट फोडुन तसेच टॉयलेट,बाथरूमचे ब्लॉकेजेस काढून,नविन फरशी बसवून.व्यवस्थीत सर्व पाईप फिटींग व प्लंबींगची सर्व कामे दर्जेदार करून तात्काळ गळती बंद केली आहे.तसेच मेन ड्रेनेजची सुध्दा दुरूस्ती करण्यात आलेली आहे.ही सर्व कामे करून त्या वस्तीगृहास आधुनिक रूप देण्याचे काम केलेले आहे.हे काम करुन सुध्दा आजपर्यंत मला सदरील कामाचे देयक मिळालेले नाही.श्री.बंडे यांनी आदेश दिल्यामुळे सदरील काम मी तात्काळ पूर्ण केले.परंतु,त्यांची बदली झाल्याने त्यांच्या जागेवर श्री.पाटील हे आले.परंतू,पाटील यांनी माझे बील वेळीच अदा न केल्यामुळे आज माझ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढला आहे.अडीच महीने झाले कोणतेही नवे काम नाही.जे काम केले.त्याचे ही बील अद्यापही मिळाले नाही.त्यामुळे सध्या मी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलो आहे.या परिस्थिती मध्ये माझे बील न मिळाल्यामुळे माझ्यासह कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे.सध्या जगावे कसे हाच मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.सदर देयकाबद्दल श्री.पाटील यांना वारंवार फोन वरून संपर्क साधला असता ते उडवा उडवीची उत्तरे देत आहेत.तरी मी केलेल्या कामाचे बील तात्काळ अदा करण्यात यावे.याप्रश्नी मी दलित महासंघाच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत आहे.कारण,उपासमारीने मरण्यापेक्षा उपोषणास बसून मेलेले कधीही चांगले होईल अशी संतप्त भावना सब काँट्रॅक्टर बापुसाहेब उदारे यांनी व्यक्त केली.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.