पाटोदा:गणेश शेवाळे― पाटोदा तालुक्यातील पोलीस बांधव कोरोनाचा प्रादुर्भाव पाटोद्यात होऊ नय म्हणून आपल्या जिवाची पर्वा न करता चोवीस तास सुरक्षा करतात यामुळे कोरोनाशी मुकाबला करताना पोलिस बांधवाचे आरोग्य चांगले रहावे व रोग प्रतिकारशक्ति वाढावी याकरीता पाटोदा तालुक्यातील सुप्रसिद्ध आंनद हार्डवेअरचे मालक अनिलशेठ बोरा व युवा उद्योजक अजिंक्य बोरा यांनी नगर येथील डॉक्टर सचिन बोरा यांच्या माध्यमातून पाटोदा तालुक्यातील सर्व पोलिस बांधवाना होमिओपॅथिक औषधाचे वाटप केले.आयुष मंत्रालय, नवी दिल्ली यांनी काढलेल्या पत्रकानुसार होमिओपॅथीमधील rs. – lb(30) हे औषध कोरोना विरुध्द लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढविण्यास व रोगप्रतिबंधात्मक औषध म्हणून घेण्याचे सुचविले आहे. यामुळे या आधी ही कोरोना विषाणू पासून पोलीस बांधवाचे सौरक्षण व्हावे म्हणून आनंद हार्डवेअर पाटोदा यांच्या वतीने पोलीस बांधवांना सॕनिटायझर हॅन्ड ग्लोज तसेच नाश्त्याची सोय केली होती व आता नेहमी सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले पाटोदा तालुक्यातील सुप्रसिद्ध आंनद हार्डवेअरचे मालक अनिल शेठ बोरा युवा उद्योजक अजिंक्य बोरा यांनी पाटोदा तालुक्यातील पोलिस बांधवाचे आरोग्य चांगले रहावे व रोग प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून पाटोदा पोलिस स्टेशन मधील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना होमिओपॅथिक औषधाची वाटप पाटोदा पोलिस पोलिस निरक्षक सिद्धार्थ माने, एपीआय कोळेकर,पीएसआय पठाण, पीएसआय पेठकर मँडम यांच्या उपस्थित जे पोलीस बांधव आहोराञ सर्वसामान्य लोकांच्या रक्षणासाठी काम करतात यामुळे त्यांचेही आरोग्य चांगले रहावे व प्रतिकारशक्ति वाढावी म्हणून आनंद हार्डवेअर यांच्यावतीने होमिओपॅथिक औषधाचे वितरण करण्यात आले फोन वरून आमच्या प्रतिनिधींशी डॉक्टर सचिन बोरा यांनी बोलताना सांगितले अनेक राज्यांनी या होमिओपॅथिक औषधाचे वाटप शासकीय आरोग्य कर्मचारी, पोलीस, नागरीक यांच्यामधे केले आहे.त्याच धर्तीवर आपल्या सरकारनेही होमिओपॅथी मधील या औषधाचा उपयोग सर्वसामान्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी करावा,असे डॉ.बोरा यांनी सांगितले. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील, तालुक्यांतील, गावातील होमिओपॅथिक डॉक्टरांनी पुढाकार घेऊन तेथिल प्रशासनाला होमिओपॅथिक औषधे नागरिकांना देण्याबाबत आग्रह करावा, आयुष मंत्रालयाचे मार्गदर्शक सुचनापत्र त्यांना दाखवावे व त्यांना होमिओपॅथीक औषधे मिळणेबाबत सहकार्य करावे. असेही आवाहन डॉ. सचिन बोरा यांनी केले. कोरोनावर आजपर्यंत तरी एखादे रामबाण औषध नाही त्यामुळे हा आजार होऊ नये याकरीता माणसाची प्रतिकारशक्ति वाढवणे हे खुप महत्वाचे आहे.यासाठीrs. – lb(30) हे होमिओपॅथीक औषध प्रभावशाली आहे.कोरोना बाधीत रुग्णांवरही काही रुग्णालयात होमिओपॅथीक डॉक्टर्स औषधे देऊन होमिओपॅथीमुळे कोरोनाबाधीत रुग्ण लवकरात लवकर कोरोनामुक्त होण्यासाठी प्रयत्न करत आहेत .कोरोनाचा मुकाबला करताना होमिओपॅथीक औषधे व होमिओपॅथीक डॉक्टर्स महत्वाची भुमिका बजावत आहे.सर्वसामान्य नागरीकांना याचा फायदा व्हावा व आपले राज्य कोरोना मुक्त व्हावे अशी आशा यानिमित्ताने डॉ. सचिन बोरा यांनी व्यक्त केली.
0